Find the Best जीवनगाणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजीवनगाणे गातच रहावे मराठी गीत, 15 जीवनगाणे, माझे जीवनगाणे, जीवनगाणे गातच रहावे, जीवनगाणे,
Sujata Bhalerao
फिकट होत जातात रंग नभीचे धुसर होते वलय निरभ्रतेचे निळसर छटा जणू अंधारते सैरभर काहूर उठते मेघही शुष्कतेने थांबले निरंतर प्रवासास निघाले मी लुब्ध होऊन सारे पाहते माझ्यातील मीपण गळून पडते सर्व रंग एक असल्याचे बघते स्तंभित होऊन सारे पाहते मी ना माझी उरते तेव्हा एकरुप होऊन जाते जेव्हा ना इथे कुठला धर्म ना जाती अन् ना पक्षाचा झेंडा हाती मिसळूनी रंगात साऱ्या तुला निरपेक्ष आठवणींचा तो झुला लोभ , माया , मोह , मत्सर समूळ नायनाट होतो नंतर प्रभाती पाखरांसवे नभी जेव्हा हलकेच मी विहरुन येतो तेव्हा एकटाच प्रवासी वाटेवरचा ठाव घेतो निर्मळ मनाचा ©Sujata Bhalerao #Dhund #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
*साक्षरता दिन* 08/09/23 साक्षर म्हणून घेणारे आम्ही ! उगाच हुरळून जाणारे आम्ही उमगलं का गणित जीवनाचं ? कधी बेरजेचं कधी वजाबाकीचं अहो , हातचा फक्त बेरजेत होतो वजाबाकीत हळूच निसटून जातो माहिती असूनही सारं काही बोलतो उगाच काहीबाही शब्द वाचताना अडखळणारे बनतात पुस्तक लिहीणारे मधला प्रवास जोखमीचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गोडी जोडाक्षर व जोडशब्दांची होते सुरेख मांडणी ओळींची येऊन बसतात शब्द पंक्तीला पुस्तक रुपाने भेटतात आपल्याला सर्वांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा 👏💐 ©Sujata Bhalerao #kitaab #जीवनगाणे# गातच राहावे
Shankar Kamble
जरासे.... क्षणभंगुर हे श्वास लाभले शाश्वत जगणे करू जरासे आडोशाला पळभर थांबून निसटले ते स्मरू जरासे.. अभेद्य आणि भरभक्कम कर तटबंदी तू पुन्हा मनाची घात घालूनी टपले वादळ पिसाट होवून भरू जरासे.. कोळून प्यालो आज हलाहल घोट रिचवले तसेच ओठी चिरडलेल्या तृण पात्याचे भाले करुनी मरू जरासे.. सैरावैरा धावत सुटले निमिष एक ना कुठे थांबले अकलेच्या या व्यर्थ वल्गना घासून ठिणगी पुरू जरासे.. शिडावीना ही नाव भरकटे खेळ हवाली तुझ्याच लाटे पोहीन म्हणतो पाठ प्रवाही बुडलो,तरलो उरु जरासे.. खूप मागणे खूप सांगणे टिचभर झोळी गगन झाकणे एक आरोळी रान पेटवू निशाण रोवून ठरू जरासे.. ©Shankar Kamble #titliyan #श्र्वास #जीवन #जीवनअनुभव #लढा #युद्ध#संग्राम #जीवनगाणे #लढायचं
Shankar Kamble
कुणांस ठाऊक प्रवासात या मुक्कामाचे गाव कोणते? दोन घडीची सोबत संगत अळवावरचे पाणी सरते.. कठीण परीक्षा आयुष्याची सहज ,सोपे नसते काही पान वेगळे, धडा वेगळा वेळ नी उत्तर समान नाही.. वेदनेचे गीत बनवूनी कुणी मुसाफिर आळवत जातो रडतो ,कुढतो, उगाच चिडतो वाट फिरूनी तीच चालतो.. खपली उडता भकास भिंती एक औकळा घरास देई चुकता गणती सुखदुःखाची हाती शिल्लक उरते काही..? एक पायरी चढण्यासाठी उन्हास त्या सावली केले हात पोळले तरीही माझे फितूर काजवे मलाच झाले.. उगाच चिंता, चिकार गुंता किती उगाळू तोच कित्ता मावळत्या सूर्याच्या साक्षी बहर येईल पुन्हा आता.. ©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस
#celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस
read moreSujata Bhalerao
नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची साथ हवी शेवटपर्यंत विश्वास हवा मी तुला अन् तू मला सावरु संकटसमयी उज्ज्वल करु भविष्य संगतीने आपण दोघेही ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
हा प्रकाश मज वाटे शीतल अन् हवाहवा... जणू या झाडामागे चंद्र असे झोपलेला... ते चांदणे टिपोरे चंद्रमाही पौर्णिमेचा... उजळून आले सारे अवघेअंधारलेले जग... लख्ख प्रकाश सारा काळोख कुठेच नसे... तेजोमय धरती सारी मजला खुणावते आहे ... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
आपल्याला सर्वजण सोडून गेले तरी ... आपल्या सोबत सदैव साथ जिची ती आपली सावली ... सावली कधी गडद तर कधी फिकी सावली कधी लहान तर कधी मोठी .... आपल्याच सावलीला घाबरुन कसं चालेल तीच करेल सोबत शेवटच्या श्वासापर्यंत ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
भूतकाळातील आठवणी हृदयाशी जपून ठेवत अन् उराशी बाळगलेली भविष्याची स्वप्ने पाहत वर्तमानकाळात जगतोय...,. पुढील आयुष्यातील आधी ठरवलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे पाऊल टाकतोय.... मी जिंकेन की हरेन काहीच माहिती नाही पण काहीही झाले तरी माघार न घेता चालतोय .... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Shankar Kamble
*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले मज भाव कोवळे जपताना* ... *लवलेश ना लयाचा आरंभ अंत पार* *हसऱ्यां फुलांसवे मी नितं स्वच्छंदी रमताना* ... *उकलली मनाच्या खोल तळाशी* *खूणगाठ बांधलेली* *शहाण्यांच्या जगात वेडा मी एक हासताना* ... *सांज होता उडून गेले पंख पसरूनी* *क्षण निसटले* *कशास गुंता उगा सोडवू शांत स्तब्ध मी खग बघताना* ... *जीवनरस हा नितं प्रवाहित खंड त्याला कदा नसे* *सुखदुःखाचे गरळ पचवूनी प्रवाही स्वैर तो वाहताना...* ©Shankar Kamble #आयुष्य #जीवन #जीवनअनुभव #जगणे_येथे_महाग_झाले #जीवनगाणे #जीव #आयुष्य_जगताना #Drown
Sujata Bhalerao
माझ्या लाडक्या बाळा कान्हा बनण्याचा तू प्रयत्न करु नकोस नको फोडूस दहीहंडी कुठली नको लावूस हात कोणत्याही मटक्याला लावलास जर चुकून हात लोणी खाण्यासाठी केलास हट्ट...... तर....... नाहक मारतील तुला ते हेडमास्तर कारण..... तिथेही तुझी जातच पाहतील अन्..... तुझ्या भावना दडपल्या जातील 😞😟😥 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे