Find the Best गातच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजीवनगाणे गातच रहावे मराठी गीत, जीवनगाणे गातच रहावे, जीवनगाणे गातच,
Sujata Bhalerao
फिकट होत जातात रंग नभीचे धुसर होते वलय निरभ्रतेचे निळसर छटा जणू अंधारते सैरभर काहूर उठते मेघही शुष्कतेने थांबले निरंतर प्रवासास निघाले मी लुब्ध होऊन सारे पाहते माझ्यातील मीपण गळून पडते सर्व रंग एक असल्याचे बघते स्तंभित होऊन सारे पाहते मी ना माझी उरते तेव्हा एकरुप होऊन जाते जेव्हा ना इथे कुठला धर्म ना जाती अन् ना पक्षाचा झेंडा हाती मिसळूनी रंगात साऱ्या तुला निरपेक्ष आठवणींचा तो झुला लोभ , माया , मोह , मत्सर समूळ नायनाट होतो नंतर प्रभाती पाखरांसवे नभी जेव्हा हलकेच मी विहरुन येतो तेव्हा एकटाच प्रवासी वाटेवरचा ठाव घेतो निर्मळ मनाचा ©Sujata Bhalerao #Dhund #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची साथ हवी शेवटपर्यंत विश्वास हवा मी तुला अन् तू मला सावरु संकटसमयी उज्ज्वल करु भविष्य संगतीने आपण दोघेही ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
हा प्रकाश मज वाटे शीतल अन् हवाहवा... जणू या झाडामागे चंद्र असे झोपलेला... ते चांदणे टिपोरे चंद्रमाही पौर्णिमेचा... उजळून आले सारे अवघेअंधारलेले जग... लख्ख प्रकाश सारा काळोख कुठेच नसे... तेजोमय धरती सारी मजला खुणावते आहे ... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
आपल्याला सर्वजण सोडून गेले तरी ... आपल्या सोबत सदैव साथ जिची ती आपली सावली ... सावली कधी गडद तर कधी फिकी सावली कधी लहान तर कधी मोठी .... आपल्याच सावलीला घाबरुन कसं चालेल तीच करेल सोबत शेवटच्या श्वासापर्यंत ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
भूतकाळातील आठवणी हृदयाशी जपून ठेवत अन् उराशी बाळगलेली भविष्याची स्वप्ने पाहत वर्तमानकाळात जगतोय...,. पुढील आयुष्यातील आधी ठरवलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे पाऊल टाकतोय.... मी जिंकेन की हरेन काहीच माहिती नाही पण काहीही झाले तरी माघार न घेता चालतोय .... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
माझ्या लाडक्या बाळा कान्हा बनण्याचा तू प्रयत्न करु नकोस नको फोडूस दहीहंडी कुठली नको लावूस हात कोणत्याही मटक्याला लावलास जर चुकून हात लोणी खाण्यासाठी केलास हट्ट...... तर....... नाहक मारतील तुला ते हेडमास्तर कारण..... तिथेही तुझी जातच पाहतील अन्..... तुझ्या भावना दडपल्या जातील 😞😟😥 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
येणारी प्रत्येक सकाळ न्हाऊन निघू दे सुगंधी फुलांसारखी मोहरु दे प्रत्येक क्षण फुलोऱ्यासारखा आकाशी जाऊ दे बहर फुलांचा आसमंतात दरवळू दे जीवनगाथा निरभ्र होऊ दे माझे जीवनगाणे स्वच्छंदी होऊ दे सर्वांचेच जगणे 💫🙌 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
किती सहज आणि सोपं असतं सूर्यफुलासम जगणं सूर्य ज्या दिशेने पुढे मार्गक्रमण करतो त्याच दिशेने वाटचाल करायची सदैव हसतमुख चेहरा जसा फुलोरा पण...... लक्षात कोण घेतो! आपल्याला फुलणं मुळी माहितीच नाही उगाच चिंतेत राहायचं सगळ्या जगाचं दु:ख आपल्या पाठीवर घ्यायचं सतत उत्साही व आनंदी राहता यायला हवं या सूर्यफुलासारखं 🌻🌻🌻🌻 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
खुर्चीचा मोह काही आगळाच मी मी म्हणणाराला झटकन उतरवती कधी पैशाचा लोभ दाखवून तर कधी.... पैशांचीच घालून भिती कैक गारद होती खुर्चीच्या मोहापायी भारुन टाकते अंतर्बाह्य हे येड्या गबाळ्याचे काम नसे नक्कीच किती आले अन् किती गेले गिनतीच नाही उरली ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
Sujata Bhalerao
शब्दाविना कळणारी असते ती मैत्री , हास्याचा अर्थ कळणारी असते ती मैत्री आसवांना ओळखणारी असते ती मैत्री शब्दांच्या पलीकडली असते ती मैत्री निखळ , सळसळता झरा म्हणजे मैत्री आनंद , उत्साह ओसंडणारी असते मैत्री उत्कट भावना प्रकट होणारी असते मैत्री भावभावनांचा सुंदर मिलाफ म्हणजे मैत्री राग , लोभ , मोह , मद , मत्सर , द्वेष , या पलीकडली असते मैत्री कधीही न संपणारी , चिरंतन सत्य असते मैत्री सर्वांना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 😊👍👏💫💞 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे