Nojoto: Largest Storytelling Platform

अनंत युगाच्या विरहात न्हाऊन निघालेल्या वाटेवर मी

 अनंत युगाच्या विरहात
न्हाऊन निघालेल्या वाटेवर 
मी अजुनही तिथेच आहे
खवळलेल्या समुद्राच्या लाटेवर

जन्मजन्माचे क्षण घेऊन
बसलोय आठवणीच्या हिंदोळ्यावर
क्षणात हसू क्षणात आसू
देतोय वाहून तिथल्या शांत किनार्‍यावर

होईल का पुन्हा कधी
भेट आपली त्या पहिल्या वाटेवर
अलवार स्पर्शाने वार्‍याच्या
स्पंदनेही बोलतात माझी खरोखर

होऊन लाट श्‍वास माझे हे
धडकतात येऊन किनार्‍यावर
जातात परत तळाशी समुद्राच्या 
कधी तरंगतात त्या खाऱ्या पाण्यावर 

सरतात सार्‍याच आठवणी 
सारे आयुष्य या जन्मातून सरल्यावर 
उरतात फक्त नेत्र कोरडे
आठवणीचे अश्रू त्यातून उतरल्यावर

©कविराज धनंजय
  #आठवणी
#कविराज_धनंजय