Nojoto: Largest Storytelling Platform

कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड, डोळ्या

कोमेजून निजलेली एक परी राणी
  उतरले तोंड, 
डोळ्या सुकलेल पाणी
सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला
घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला!

सुखरूप केले तु माझे कन्यादान, माझ्या साठी झुकवली
तुझी तु मान
न मागता मला तु सर्व काही दिले
माझ्या चरणी आणले, आभाळ निळे
तुझे प्रेम मला पुन्हा देशील का र?
माझ्या डोकी हात तुझा ठेवशील का र?

सासरी जाता जाता उंबरठ्या मध्ये माझ्या साठी काढू नको बाबा 
पाणी डोळ्या मध्ये
सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला
घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला!

उद्या सकाळी बाबा जाणार सासरी 
  आई बाबा च्या हाताने खाऊन भाकरी
बांध ना रे माझ्या साठी हाताचा झुला
घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला!

अशी कशी प्रथा बाबा? मनामध्ये घोर
मला माझा बाबा नाही ,तुला तुझी पोर
लेक जाता सासरी मनात रडतो 
चेहर्‍यावरच हसण तुझ मलाही कळत

नको करू चिंता मी सुखाने राहिन
सासू सासरे मध्ये बाबा तुला पाहिन
सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला 
घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला!

©munisa
  #maaPapa #bidaayi #maa #marathi #MarathiKavita #Marathipoem