Nojoto: Largest Storytelling Platform

आठवांचा पाऊस होऊन ओघळतोस गालावर तुझ्याशिवाय अश्रूं

आठवांचा पाऊस होऊन ओघळतोस गालावर
तुझ्याशिवाय अश्रूंनी स्पर्शाव पटनारे का तुला?

केसातल्या गजऱ्यात तुझाच प्रेमसुवास असतो
कुणीतरी मोहित करावं रुचणार आहे का तुला?

पैंजनांत सुर, तू माझ्यासाठी गायलेल्या गीतांचा
तुझ्याविना मनी छेडती धून ऐकवणारे का तुला?

डोळ्यात साठत्या या छबीत फक्तं तूच तू असतो
रिक्त असे माझे नयन पाहवणार आहेत का तुला?

जीवप्राण होऊन श्वासात तूच दरवळत असतोस
कुणी इतकं जवळ व्हाव सहन होणारे का तुला? 

अपूर्ण अशा गोष्टी, तुझ्यानेच अखेर पूर्ण होतात
अर्धवट आपण असे, आवडणार आहे का तुला?

शब्दाशब्दात भाव फक्तं अन् फक्तं तुझाच असा
तुझ्याविना कविता सुचनार तरी आहे का मला?

©Radhika
  #MarathiKavita #Marathipoem #marathi #marathimulgi #Prem #tuanimi #virah #prem_nirala_