Nojoto: Largest Storytelling Platform

येणारी प्रत्येक सकाळ न्हाऊन निघू दे सुगंधी फुलांसा

येणारी प्रत्येक सकाळ
न्हाऊन निघू दे
सुगंधी फुलांसारखी
मोहरु दे
प्रत्येक क्षण
फुलोऱ्यासारखा
आकाशी जाऊ दे
बहर फुलांचा
आसमंतात
दरवळू दे
जीवनगाथा
निरभ्र होऊ दे
माझे जीवनगाणे
स्वच्छंदी होऊ दे
सर्वांचेच जगणे
💫🙌

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे