Nojoto: Largest Storytelling Platform

किनारा निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा

किनारा

निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा....
शोध घेत आयुष्याचा, बघ सापडतो का किनारा?

प्रवाहात तुज कैक भेटले, किती उमजले? किती न सुटले ?
भुणभुण करी भयाण वारा, कोलाहल सारा...
बघ सापडतो का किनारा??

मनात वादळे कुशीत माया, पयोद उभा हा डोळ्यांतून सारा..
डगमगणाऱ्या वाटेवरती अश्रूंचा पसारा 
बघ सापडतो का किनारा??

जाळ्यात कशी तू गुंतुनी जाशी, स्वप्नांना का ठेवूनी उशाशी
अल्लड अवखळ मनात तुझिया, फुलवित जा पिसारा
बघ सापडतो का किनारा??

उत्तुंग गगनाची भीती कशाला, गहनता सागराची मापू कशाला 
विश्वस्त होता तूच तुला, उजळे मन गाभारा, 
बघ सापडतो का किनारा??

नयन रोखुनी दिसे किनारा, स्वप्नांच्या वेशी दिव्य मनोरा..
भयावरी मग मात करुनी, निघे शिडाचा डोलारा..
बघ सापडला किनारा, बघ सापडला किनारा....

अमिता🌸✍️

©Amita
  #Sea 
#marathi 
#MarathiKavita