Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या लाडक्या बाळा कान्हा बनण्याचा तू प्रयत्न कर

माझ्या लाडक्या बाळा
कान्हा बनण्याचा तू 
प्रयत्न करु नकोस
नको फोडूस
दहीहंडी कुठली
नको लावूस हात
कोणत्याही
मटक्याला
लावलास जर
चुकून हात
लोणी खाण्यासाठी
केलास हट्ट......
तर.......
नाहक
मारतील तुला
ते हेडमास्तर 
कारण.....
तिथेही तुझी
जातच पाहतील
अन्.....
तुझ्या भावना
दडपल्या जातील
😞😟😥

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे