Nojoto: Largest Storytelling Platform

कधीच नाही कंटाळा कधीच नाही आळस फुलतेस अविरत कायम ट

कधीच नाही कंटाळा
कधीच नाही आळस
फुलतेस अविरत
कायम टवटवीत
असो कोणताही ऋतू
नाही पडत कोडे
कळी हळूच उमलते 
अन् फुले सदाफुली 
सदाबहार शिकवतेस
सार जीवनाचे
शेवटी आयुष्य म्हणजे
तरी काय हो ? 
सर्वांना आनंद देत
सदा फुलणेच ना !

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे