Nojoto: Largest Storytelling Platform

खूप छान वाटतं तुझं माझ्या सोबत असणं.. दिवस छान


खूप छान वाटतं 
तुझं माझ्या सोबत असणं..
 दिवस छान जातो 
तुझं बघून सुंदर हसणं...

कधी विचार नाही केला
 तुझ आयुष्यातच नसणं.. 
तुझं असणं म्हंजे जणू 
स्वर्ग पृथ्वीवरती भासणं..

खरंच खूप छान वाटतं 
हातात हात घेऊन चालणं..
तू दीर्घायुषी होवो 
देवाकडे हेच एक मागणं ..

तू दीर्घायुषी होवो 
देवाकडे हेच एक मागणं ..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  वाढदिवस