Nojoto: Largest Storytelling Platform

किती सहज आणि सोपं असतं सूर्यफुलासम जगणं सूर्य ज्या

किती सहज आणि सोपं
असतं
सूर्यफुलासम जगणं
सूर्य ज्या दिशेने पुढे
मार्गक्रमण करतो
त्याच दिशेने वाटचाल करायची
सदैव हसतमुख चेहरा
जसा फुलोरा
पण......
लक्षात कोण घेतो!
आपल्याला फुलणं मुळी
माहितीच नाही
उगाच चिंतेत राहायचं
सगळ्या जगाचं दु:ख
आपल्या पाठीवर घ्यायचं
सतत उत्साही व आनंदी
राहता यायला हवं
या सूर्यफुलासारखं
🌻🌻🌻🌻

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे