Nojoto: Largest Storytelling Platform

Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पु

Village Life लेखणीतूनी ......

वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे 
प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे....

खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी
मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी....

व्योमात विहंगथवा, एकटक बघावा
मोगरा कधीतरी, केसात सजवावा....

आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे
काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे....

अमिता✍️

©Amita
  #marathi 
#MarathiKavita