Nojoto: Largest Storytelling Platform
abhijeet1108
  • 28Stories
  • 64Followers
  • 264Love
    0Views

Abhijeet

वास्तवात जगायला आवडत. मनमोकळा, खोडकर, उडान.

  • Popular
  • Latest
  • Video
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

प्रेम होते ते तुझे , का फक्त वेड्या  भावना ?
हे तुझे  काहीच नाही समजावले माझ्या  मना !
भेटणे अन हरवणे माझ्यात मी आता नको 
स्वप्न भरल्या पापण्यांचा भार ही आता नको.

©Abhijeet Love

#Woman
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

ज्या वाटेवर तुझी आठवण
त्या वाटेचे वेड मला,

ज्या वळणावर स्वप्न रुपेरी 
त्या वळणावर भेट मला.

©Abhijeet Love

#achievement
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

हट्टी पहाट ओठात हलकेच  रेंगाळते
 
दव भिजलेले स्वप्न तुझ्या डोळ्यात वाहते. 
.
शेला चांदण्यांचा शुभ्र स्पर्श देहात कोरतो
 
चंद्र सोबतीला सारे अर्थ नभात सांडतो.

©Abhijeet Love ❤️

#Sea
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

आपण आयुष्यभर कोणासाठी स्पेशल असू हा विचार करणं सोडून दिले तर बरच समाधान वाटेल मनाला. 

कारण माणसाच्या आवडी- निवडी, सवयी, स्वभाव हा काळानुरूप बदलत जातो.

©Abhijeet Alone

#Light
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

मी नाराज नाहीये तुझ्यावर, पणं
बोलण्यासाठी तुला आग्रह करायचा नाहीये.

लांब नाहीये तुझ्यापासून, पणं
जवळ येण्यासाठी आग्रह करायचा नाहीये.

रागावलो नाहीये तुझ्यावर, पणं
मला मनवावस असा आग्रह करायचा नाहीये.

करमत नाहीये तुझ्याशिवाय, पणं
तुला भेटण्यासाठी आग्रह ही करायचा नाहीये.

एकटाच आहे आता, पणं तुला
 पुन्हा प्रेमात पडण्यासाठी आग्रह ही करायचा नाहीये

©Abhijeet Alone 

#adventure
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

#moving_on
हल्ली हा शब्द खूप कानावर येतो.. मुव्ह ऑन व्हा.. अडकून पडू नकात जुन्या आठवणींत.. जुन्या प्रेमात.. विसरा सगळं.. पुढे चला.. नवीन गोष्टिंना आयुष्यात जागा द्या.. वगैरे वगैरे... 

पण खरच  हे शक्य असतं का? खरच असं विसरलं जातं?? इतक्या आठवणी, कित्येक प्रसंग, एकत्र घालवलेले कित्येक क्षण... त्या आठवणींनी आलेलं ओठांवर स्माईल. अन् डोळ्यात किंचित तरळलेलं पाणी.. कशा विसरता येतील या आठवणी? स्पर्शाच्या आठवणीी पण देहावर रेंगाळत असतात.. वर्षोनुवर्ष... आठवून मोहरायला होतं.. नंतर देखील.. कसं विसरता येतं? तुमचं अख्खं जग असतं तुमच्यासाठि ती व्यक्ति..  काहि काळ तरी... इतकं सहज विसरू शकतो?? 

नाहि येत मुव्ह ऑन व्हायला कित्येक जणांना.. 🤗🤗🤗

©Abhijeet Love you ❤️❣️

#Love

Love you ❤️❣️ Love #moving_on #जीवनअनुभव

132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

थांब थोडे दिवस

फक्त काही दिवस.

जाईल मी तुझ्या आयुष्यातून

नक्की एक दिवस.

©Abhijeet Alone

#Life

Alone #Life

132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

समजतंय मला तुझ्या आयुष्यातून 

मला हळू हळू दूर करण. 

माझ्या छोट्या छोट्या गोष्टीचा कंटाळा,

त्रास येऊन मला आयुष्यातून वजा करण.

©Abhijeet alone

#seashore

alone #seashore

132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

काल बापाच्या त्यागावर 

चर्चा फार झाली.

सांगा किती लेकरांची 

आज बापाशी बात झाली. 

:- अभिजीत...

©Abhijeet #FathersDay
132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

कोई आपसे तंग आजाये तो
उससे दूर हो जाओ

बोझ बन जाने से अच्छा याद बन जाना बेहतर हे!.

अब जबरदस्ती से रिश्ते तो नहीं बनते.

©Abhijeet

loader
Home
Explore
Events
Notification
Profile