Nojoto: Largest Storytelling Platform

Best विशालाक्षर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विशालाक्षर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 22 Stories

Vishal Potdar

#good_night

read more
White #विशालाक्षर 

मातीच्या आकाशात 
पारिजातकाच्या चांदण्या 
विसावतात
निजतात
आणि आभाळभरून पाझरते
दरवळती माया...

मुळांची ओंजळ
तुझ्या हाती फुलं देते
आणि ओंजळीत उगवतो
फुलू पाहणारा 
चंद्र.....

©Vishal Potdar #good_night

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर 

धावते पालखी
वाहते पालखी

लेकरांच्या कुशीत
गलबले पालखी...

       - विशाल पोतदार

©Vishal Potdar

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर

मारव्यातली एक विलंबित बंदिश
संधीकाळाच्या चित्रात 
कैद व्हावी..

ते चित्र पाहताना 
त्यातल्या क्षितिजातल्या रंगात
गहिरा होत जाणारा आलाप
जसा जाणवेल

तसेच काहीसे
आजकाल 
तुझ्याकडे पाहताना वाटते....

©Vishal Potdar

Vishal Potdar

#Chalachal

read more
#विशालाक्षर
#विठोबाची_कविता

विठोबाची पावलं...
आता झिजत चाललीत..

टेकणाऱ्या प्रत्येक माथ्याला
एकेक कण स्वाधीन करत
विरत चालली आहेत...

एके दिवशी
पावलांसहीत तोच दिसेनासा झाला तर?

भांडायचं कुणाशी मग मी
हक्कानं...
मोकळ्या विटेकडे कशी मागावी उत्तरे
चक्रव्युहांची..
कोरड्याठाक पडलेल्या 
अनंत खोल गाभाऱ्यात
कसं उगवायचं पुन्हा पुन्हा....?
वारीअंती
भरल्या डोळ्यांनी
कुणाकडे पाहायचं
डोळे भरून..?

ब्रम्हतत्व व्यापून राहिलेलं असतं म्हणे
सर्वत्र......
सगळं सगळं मान्य..
परंतु आईच्या कुशीचा खराखुरा स्पर्श
नुसत्या आठवणींत नाही ना मिळत...

विठ्ठला..
विठ्ठला..
अजून लाखो युगे तरी...
असाच इथे थांब..
तुला परवानगी नाही
झिजण्याची..
तू बंदी आहेस
तुझ्या प्रेमात असणाऱ्या
या प्रत्येक जीवाचा...!!


      - विशाल पोतदार

©Vishal Potdar #Chalachal

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर

नव्या कोऱ्या घराच्या नांदीत
जुनी भिंत उतरवताना
मनाच्या खिडक्या गलबलल्या
खूप आत
एक बाळ मुसमुसून रडू लागलं..

त्या पांढऱ्या मातीच्या अफाट जगातला
माझा पहिला श्वास
पहिला शब्द
पहिलं हसू
पुन्हा फेर धरू लागले 
व्याकुळ नजरेने..

फुटक्या कौलातून 
पाहिलेला प्रत्येक चंद्र
सगळ्या सगळ्या चांदण्या घेऊन
सांत्वन करायला उतरून आला
पण मन मानत नाही...
काही क्षण तरी नाहीच...

कसे खोडावे त्या भिंतींवर फिरलेले हात
कसे बुजवावेत 
रुसल्यावर कुशीत घेणारे कोपरे
कशा काढून टाकायच्या 
काही क्षण आयुष्य टांगून ठेवता येणाऱ्या खुंट्या

काही काही कळेनासं झालं
रडू ही कोसळत नव्हतं
काही भरल्या क्षणांनंतर
घराच्या मऊ कुशीत
रुसल्या मनाला निजवून
बांधून घेतली
आठवणींचा पाणवठा जन्मोजन्मी पुरेल इतकी
मूठभर मातीची शिदोरी.....



              - विशाल पोतदार

©Vishal Potdar

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर

एक दिवा फडफडू लागतो
तेव्हा दुसऱ्याने वात पणाला लावून
तेवून राहायला हवं

कधी कधी शांततेचंही वादळ
हलवून टाकेल
दोघांमधला पूल

कधी कधी प्रकाशाचा भयंकर झोत
दिपवून टाकेल
नुसतं असणंही..

अशावेळी..
घनदाट क्षणांतून
वेचायला हवा 
जादुई आभास..
आणि मंद अशा प्रकाशाला प्रसवत
न्हाऊन घालावं आपल्या माणसाला..
अंधाराची माती उरात पेरून
पोहोचवायला हवा
प्रेमाचा कोवळासा कोंभ..
वातीपासून
मनापर्यंत...

©Vishal Potdar

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर
#Fathers_Day

बाभळीसारखा रखरखीत माणूस
कसा लेकराजवळ फुलपाखरू होतो

मख्ख दगडासारखा चेहरा
कसा पिटुकल्यापुढे नटसम्राट होतो

वेळच नसणाऱ्या माणसाचे
तासन्तास छोट्यासाठी खुले होतात

कफल्लक जरी झालाच तर
होतं नव्हतं ते त्या जीवाच्या नावे होऊन जातं..

बापपण स्वयंभू असतं..
हाताचा झोका
पायाची गाडी
श्वासांचं गाणं
मनाचा गर्भ 
हृदयाचा पान्हा होतो
आणि बाळासोबत..
एक बाप क्षणात जन्म घेतो...         

                    - विशाल पोतदार

©Vishal Potdar

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर
#वाहतं_प्रतिबिंब
 
नदीत पडलेली 
झाडाची तडफडणारी प्रतिबिंबं 
वाहत जावीत कधी कधी 
त्यांना हवं तिथं पर्यंत..

हवं तर समुद्रापर्यंत
नाहीतर उगमा पर्यंत..

खितपत पडलेली ती प्रतिबिंबे पाहण्यास..
स्पष्ट नकार देणारे डोळे..

ते डोळे
इतके गच्च मिटावेत की
सगळं पाहायला लागावं 
जे आहे ते..
जसंच्या तसं..
फक्त मिटल्या नजरेनं..

आणि मग ती नजर 
वाहत राहावी
तरंगत राहावी..

हवं तर अंतापर्यंत
नाहीतर अंतापासून आदीपर्यंत..

©Vishal Potdar

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर
#मिठी_म्हणजे

मिठी म्हणजे 
हजारो शब्द
आणि त्यात विरघळलेली 
मोहक कविता

मिठी म्हणजे
बांधून ठेवणं
अलगद केस सोडल्यावर
मोगऱ्याचं भान
उरत राहणं

मिठी म्हणजे 
काही क्षण
थांबवणं काळ
निरोप घेता घेता
पुन्हा पुन्हा
छातीशी घेणं

मिठी म्हणजे
गडद काळोख
अस्तित्व सांडून
एक होणं
एकच उरणं...

    - विशाल पोतदार

©Vishal Potdar

Vishal Potdar

read more
#विशालाक्षर

माझ्या फुला
असे मिठीत येऊ
असे गुंफून राहू
की सगळ्या पाकळ्या मिटून
जाऊ पुन्हा देठात विरून...
कळीच्या.. 
पानांच्या..
मुळांच्याही आधीच्या जन्मी
भेटू..
एक होवू...

असे मिठीत येवू..

        - विशाल पोतदार

©Vishal Potdar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile