Nojoto: Largest Storytelling Platform
mayuribhosale6110
  • 23Stories
  • 15Followers
  • 333Love
    0Views

Mayuri Bhosale

  • Popular
  • Latest
  • Video
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

लेक वाचवा...
मी तर आहे वेलीची एक कळी, 
नका तोडून टाकू उमलण्याआधी फुलाची पाकळी.
मुला मुलीत नका ना करू भेद, 
अजूनही विचार बदलत नाहीत हाच एक मनी खेद. 
बाबा मी तर आहे ना तुमची लेक,
मग का जाऊन करता मला दवाखान्यांमध्ये चेक.
माझ्याही असतात काही आशा, 
का वाट्याला येतात माझ्याच फक्त  मग निराशा.
आई बाबा करा ना माझाही विचार,
देऊ नव्या जीवास एक वेगळा आकार. 
मला समजू नका हो तुमचा भार, 
मी ही होईन  तुमचा नक्की उद्याचा आधार.
मी तर आहे ना तुमची मुलगी, 
मग नका ना करू जगात येण्याआधीच माझी चुगली.
मलाही द्या माझ्या जन्माचा अधिकार, 
मी ही उद्या प्रगतीचे स्वप्न करीन तुमचे साकार.
सारे जग म्हणते लेक वाचवा लेक वाचवा, 
असाच डंका घरोघरी घुमूनी साऱ्यांच्या मनात तो पेरावा.

©Mayuri Bhosale लेक वाचवा

लेक वाचवा #मराठीकविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

समुद्र.... (रहस्यमय न उलगडलेले एक गुपित) 

उधळती समुद्राच्या वाऱ्याबरोबर लाटा, 
आतमध्ये दडलेल्या प्रश्नांना मिळतात  मनासारख्या वाटा.
किनारी ओथंबून वाहे शांत निर्मळ हवा, 
मेघ बरसती आठवती सुखद क्षणांचा तो गारवा. 
आकाशाचा रंग तू पांघरलास सभोवती,
खळखळाट आवाज पाण्याचा  गाणे मंजुळ गाती. 
आयुष्य हे तुझ्यासारखे खोल रुंद पातळी,
स्वतः जळत राहूनही प्रकाश देई मेणबत्ती मधील सुतळी. 
तुझ्यातील भरती ओहोटीचे कौतुक असे,
समुद्राचे ते वेगळेच रूप मग दिसे. 
भरतीचा नाही कुठला गर्व त्यास, 
ओहोटीची ही नाही कुठली खंत  त्याच्या मनास.
रोज नव्याने तू जगुनी घेतो,
असला उन्हाळा ही पाटीवर तू झेलतो. 
रात्री सोबतीस असे  चांदण्याचा शिंपलेला सडा,
खूप काही शिकण्यासारखे मिळतो जीवनास नवीन धडा.
तुझी किती आहे ती अबोल वेगळी भाषा, 
उमटवतोस जगण्याची नवीन एक आशा.
असे तुझे रहस्यमय दडलेले एक गुपित, 
कधीच न उलगडलेले कोडे सामावून घेऊ आयुष्याच्या मुठीत

©Mayuri Bhosale #समुद्र
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

झेप....🕊️🕊️🕊️🕊️🕊️
आकाशात उंच उडावेस तू होऊन पक्षी,
पाखरा सारखी घे भरारी नभ तारे सारे साक्षी. 
परत कधी मागे वळून पाहू नकोस, 
येतील अंधार दाटूनी हताश तू होऊ नकोस. 
प्रगतीची पावले तुझी उमटतील, 
कर्तुत्वाच्या कौतुकाचे स्वागत सारे करतील. 
सारे जग उभे असेल तुझ्या नेहमी  पाठीशी,
लहान परी हरवू नकोस मात्र तूझ्यातली ती बाळग उराशी.
सफलता अशी मिळावी असेल उत्तुंग भरारी ती गगनाची,
प्रत्येक घरात जसे आहे महत्त्व धागे दोरे अन् सुईची.
तू परतावीस होऊनी तंत्र विज्ञानामधील विरांगणा, 
तूच व्हावीस सर्व मुलींच्या कल्पनेतील कल्पना.
एक दिवस तुझ्या प्रयत्नांना मिळेल असे यश, 
दिव्यांनी ही उजळून निघेल तुझ्या सामर्थ्याचे लक्ष.
 झेप अशी असेल तुझी आकाशी सारेच चकित होऊन जातील,
कष्ट जिद्दआणि चिकाटीची कथा होऊनी पुढे ते गुणगुणतच राहतील

©Mayuri Bhosale #झेप
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

प्रेमाची चाहूल....💓💓💓
तू असल्याचा भास सारा, 
मृगजळाच्या लाटा होती वारा. 
नाही भान कशाचे तू असताना, 
व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. 
आयुष्यातील सुंदर भेट तू, 
आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. 
उन्हाचा ही भास नसे  तू सोबत असताना, 
सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना.
हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे,
नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. 
हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे,
नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे.

©Mayuri Bhosale #प्रेमाची चाहूल
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

प्रेमाची चाहूल....💓💓💓
तू असल्याचा भास सारा, 
मृगजळाच्या लाटा होती वारा. 
नाही भान कशाचे तू असताना, 
व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. 
आयुष्यातील सुंदर भेट तू, 
आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. 
उन्हाचा ही भास नसे  तू सोबत असताना, 
सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना.
हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे,
नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. 
हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे,
नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे.

©Mayuri Bhosale प्रेमाची चाहूल

प्रेमाची चाहूल #मराठीकविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️

सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस 
जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस 
जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस 
मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस
 वणवणत्या रानातील शांत  गारवा तू आहेस
अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस 
दरबारातील रुबाबदार राजस  रूप तू आहेस 
मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस.

©Mayuri Bhosale #तू आणि तूच आहेस

#तू आणि तूच आहेस #मराठीकविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

White ओ पहली मुलाकात.....

दिल मे दबी हुई वो हसी 
लगती है हमे आँखो मे अभी भी वैसी ही फसी
सब कुछ लुटा दिया है हमने तुम पर 
मगर दिल धडकते ही आ जाते है होशपर 
आप को देखा तो ऐसा लगा की उडणे लगे है हवा में 
वैसे तो चाॅंद तारे शामिल है हमारे मिलन के गॅंवा में
कुछ तो खास थी आप में वो बात 
याद आती है हमें ओ पहली मुलाकात ओ पहली मुलाकात.

©Mayuri Bhosale #ओ पहली मुलाकात

#ओ पहली मुलाकात #कविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

तुझा लढा...
नाही संपला अजूनही तुझा बाई हक्काचा लढा, 
कठीण आहे सारे तरीही प्रबोधनाच्या पायऱ्या वरती चढा.
समाजातील बुरसटलेले विचार तुला आहेत बदलायचे, 
येतील वादळे खूप तरीपण नाही कुठे अडकून थांबायचे.
पटवून देऊ साऱ्यांना की आम्ही पण आहोत मानव जात,
वेळ आल्यावर गगनालाही भिडूनी संकटावर करू मात.
हा लढा तुझा आहे तत्व व मूल्य जपण्यासाठी, 
नाही जन्मली फक्त तू जगण्या मारण्यासाठी. 
विसरू नकोस पण तुझ्या लढ्यात माणुसकी धर्माची, 
हार नाही होणार कधीच या आत्मनिर्भर संघर्षाची. 
लढा असा लढ तलवारीची धार होवूनी तू शिवबांची,
मानसन्मान जपू येथे साऱ्यांचा होऊनी कन्या जिजाऊंची.

©Mayuri Bhosale
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

शायरी चाय लव्हर....

जिसने चाय को ठुकरा दिया 
फिर उसने जिंदगी मे आके क्या किया 
कहते है  लत लगी है इसकी हमें 
एक प्याली लेकर देखो फिर बताओ कैसे लगता है तुम्हे
सुबह की शुरुवात का तुम बने हो मेरे बुक का कव्हर 
हर समस्या की दवा है ये आप भी बन जाओ चाय लव्हर .

©Mayuri Bhosale #चाय लवर
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

  तुझ्याचसाठी....❣️❣️❣️

दारी बहरला मोगरा तुझ्याचसाठी
मनी सुगंध तोच खुलला तुझ्याचसाठी 
गीत उमटले ओठी तुझ्याचसाठी 
धडधड हृदयाची चाले फक्त तुझ्याचसाठी 
रात्र ही थांबून राहिली तुझ्याचसाठी 
नभी चांदणे पसरले तुझ्याचसाठी 
मंद वारा वाहू लागला तुझ्याचसाठी
सागरी किनारा वाट पाहे तुझ्याचसाठी 
रिमझिम पाऊस हि पडे तुझ्याचसाठी 
ओढ लागली भेटीची चातका सारखी तुझ्याचसाठी 
मी न माझी राहिले आहे फक्त तुझी आणि तुझ्याचसाठी
जन्मोजन्मी हे नाते जपले मनी तुझ्याचसाठी

©Mayuri Bhosale #तुझ्याचसाठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile