Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3425011773
  • 13Stories
  • 62Followers
  • 92Love
    26.9KViews

aniket kesare

😎 अभिमन्यु think different

  • Popular
  • Latest
  • Video
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

कपाट आवरताना एक जुनं पुस्तक हातात आलं 
न् बघ ना 
केव्हाचा गुंतलोय मी त्याच्यात,
ती कोपर्याकोपर्यांत दुमडलेली,
केशरबदामी रंगाची पानं,
काही केल्या उलटलीच जात नाहीयेत,
त्यांनी अजुनही जपल्या आहेत त्या खुणा,
मोजक्याच ओळींखाली ओढलेल्या रेघोट्या,
आताशा पुन्ह्यांदा प्रेमात पडलोय मी त्यांच्या,
एकेक पुस्तकं म्हणजे आत्तराची कुपी असते,
माहितय ?
मी टिपतोय  अत्तर  थेंबाथेंबात,
पण इतक्यात भरेल ते माझं मन कुठलं,
ती तरी कधी कमी पडतात,
पुस्तकं हजारदा जरी हुंगली तरी संपतात का कुठं,
त्यांचा प्रत्येकदा आलेला गंध,
त्यांचा प्रत्येकदा झालेला स्पर्श,
नव्याने येणार्या श्रावणासारखा असतो,
आपल्याला फक्त अनुभवता आलं पाहीजे,
पुस्तकं फक्त वाचायची नसतात गं,
ती जगायची असतात,
ती जपायची असतात मनाच्या टाळाबंद पेठार्यात
अविरत.......
-अनिकेत केसरे.

3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

खरय ना,
शापित नजरेस तुझ्या नशेचा श्राप आहे,,
मांडेल तिच्या देहाला, काय इतकी शब्दांस तुझ्या धार आहे...
~अनिकेत केसरे. #marathi
#marathipoetry
#marathisahitya
#मराठी
#मराठीकविता
#मराठीसाहीत्य
#marathikavita
#hindipoems
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

द्यावं काट्यास धारदार आंदन,
ह्रदयाचा हरवेळ विचार कशाला ?
~अनिकेत केसरे. #मराठी
#marathiwriters
#marathiwrites
#marathikavita
#marathipoetry
#hindipoetry
#poetry 
#ani
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

जन्मल्याने येथे विटाळ होतो,
मुडद्यांचे किती तु सुतक पाळशिल.. 
-अनिकेत केसरे #मराठी
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

तहान प्रेमाची राहीलीच नसती,
काय आसवांची कत्तल रोज सजली असती.
~अनिकेत केसरे.. #marathipoetry
#hindipoetry
#aniketkesare 
#ani
#marathi
#prem
#tears
#love
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

डोळा दिसावा विठ्ठल
व्हावं आयुष्य एकादस,
पुर्या जिंदगीला जोड
शब्द अभंग अभंग,,

व्हावा पवित्र, निर्मळ
जिव तुळशीचा हार,
जिन्या साथी तन
मन अभिर अभिर..
~अनिकेत केसरे.

3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

अलवार वारा मज बिलगुन अाला,
चाहुल तुझी श्वास मोगरा जाहला.. #marathipoetry 
#hindipoetry 
#ani
#aniketkesare 
#quotes 
#marathiquotes
#hindiquotes
#mogara
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

ते अस्पष्ट धूलीकण,अणू, रेणू, उंचखोल डोंगरदर्या, विश्व, कृष्णविवरं, अनंत्
 प्रचंड उलथापालथ, गोंधळ,
त्यातच तुझ अस्तित्व आणि तो तुटलेला तारा..
निष्कारण ?

~अनिकेत केसरे. #मराठी
#aniketkesare
#Ani
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

#marathipoetry 
#hindipoetry 
#aniketkesare
3e82ea3d94513b341b01d3bf227c15b3

aniket kesare

तो रोज कुंडीतल्या सुकल्या झाडाला पाणी घालायचा,
आणी 
ती वेडा समजुन त्याच्यावर हसायची.. #तो 
#ती
#aniketkesare
#aniket 
#hindipoetry 
#marathipoetry
loader
Home
Explore
Events
Notification
Profile