Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2723545083
  • 18Stories
  • 24Followers
  • 128Love
    250Views

हरिश्चंद्र धिवार

  • Popular
  • Latest
  • Video
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

तुझ्या श्वासात गुरफटावे
तुझ्या हृदयात दरवळावे
स्खे तू मोगरा  जाई जुई
तुझ्या स्पर्शाने मोहरावे...

©हरिश्चंद्र धिवार
  #proposeday
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

कुठे कुठे पुराने तर प्रचंड कहर केला
अन कुठे कुठे बळीराजा जहर प्याला..

® लोककवी डॉ. हरिश्चंद्र धिवार,मुंबई.

©हरिश्चंद्र धिवार
   असाही एक पाऊस...😟

असाही एक पाऊस...😟 #मराठीकविता

168 Views

4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

माझी नात स्नेहल(सई) हिने माझी कविता जिवन्त केली..

माझी नात स्नेहल(सई) हिने माझी कविता जिवन्त केली.. #मराठीविचार

27 Views

4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

चातकावाणी वाट पाहतोय
सखे तुझ्या एका संदेशाची...
मन माझं शोध घेतंय ग
तुझ्या आठवांच्या सरींची...

हरीश🌹🙏🏻✍

©हरिश्चंद्र धिवार
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

*झुला...*

प्रीतीच्या अंगणात पुन्हा
फुलवावे प्रेमाच्या फुला,
मनाच्या फांदीवर द्यावा
सुखद आठवणींना झुला...

*Harish धिwar...*✍️
       शुभ रात्री🌹

©हरिश्चंद्र धिवार
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

*पावसाला सांगतो मी*
*सरी वर सरी पडून जा,*
*सखी एकटी तुझ्या बाहुत*
*तिला जराशी भिजवून जा..*

हरिश्चंद्र धिवार, मुंबई..😝✍️

©हरिश्चंद्र धिवार
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

*प्रीत वैशाख...*

जरी तप्त असला वैशाख वणवा
रणरणत्या उन्हात
तुझ्या मिठीचा गारवा
कुठूनतरी सावली यावी
जणू तुझ्या मिठीची
पाखरण भासावी...
अचानक यावा गार वारा
सोबतीला असावा निसर्ग सारा
त्यातच यावी पावसाची सर
भिजून जावं अंगभर
भास सारे दूर व्हावेत
ते अनमोल क्षण
तुझ्या मिठीच्या कैदेत जावेत...
कोसळावा प्रीतीचा 
धोधो पाऊस अंगभर
त्यातच दोघे तृप्त होऊन
विसावूया क्षणभर...
चल साजने भिजून
विसावूया क्षणभर...!

*हरिश्चंद्र धिवार, मुंबई*
      ९९२०३१८३९१
      ८३५६९४५८३२

©हरिश्चंद्र धिवार
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

खरं सांगू तुझ्यावर
प्रीत माझी जडली ग,

वेडा झालो तुझ्या रुपात
अन तू कुणात फसली ग..🤔

©हरिश्चंद्र धिवार
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

🌹🤗
■■~~~~~~~~~~~~~~~~
         *शुभ सकाळ...*

चुकला जरी वाट मानवा
पुन्हा नव्याने मार्ग शोध,

तुझ्या कर्तृत्वाची दखल घेऊन
तरुणाई आजची घेईल बोध...
~~~~~~~~~~~~~~~~■■
                  
                                           🌹🤗

©हरिश्चंद्र धिवार
4be4a6b1ad31c22909745be78cb1347a

हरिश्चंद्र धिवार

🌒🌼
~~~~~~~~~~~~~~◆◆
*सूर्य लोपता नभात*
*काळोख धर्तीवर झाला,*
*काजळी नभास चढता*
*चंद्रमा पाहुणा आला,*
 ◆◆~~~~~~~~~~~~~~~
               ✍️ शुभ रात्री
                                           🌒🌼

©हरिश्चंद्र धिवार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile