Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5251098174
  • 7Stories
  • 30Followers
  • 590Love
    0Views

आदर्श....✍️

मेरी जिंदगी एक किताब हे..

  • Popular
  • Latest
  • Video
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

White कामगारा....ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

आज धर्मपुरी उद्या धाराशिव,
मग पुणे जालना परभणी,
असे किती दिवस मोजायचं..!
सवाल आहे कामगारा तुला
धडावर मेंदूला नुसतंच ठेवून
किती दिवस बघायचं..!

तुझी निब्बर चोच
नुसतीच वाळूच्या ढिगाऱ्यात खुपसू नको;
खुपस नराधमाच्या डोळ्यात.
गळून पडली पाहिजे त्याची मुजोरी,
झाला पाहिजे साक्षात्कार त्याला कृत्याचा.!

वार कर धडक नजरेतून,
तुझे शब्द शब्द गुंजू दे नभा नभात..!
तुझे बोल भेदले पाहिजे त्याच्या छातीला
कर नरसंहार अश्या प्रवृत्तीचा..!

ठेच,नागी विषारी आताच,
तमा नको विख छळेल थोडं...!
मिटली पाहिजे जमात विखारी
नको आता भीती नको कशाची..!

कामगारा..ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

©आदर्श....✍️ कामगारा

कामगारा #मराठीविचार

4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

हे सिद्धार्था..!

माझ्या समवेत असंख्य 
पामरांचा,
तारणहार आहेस तू..!
माणसांच्या बुद्धिला एव्हढी 
मोकळीक देऊन स्वतःचीच 
वैचारिक चीरफाड 
करणारा एकमेव तू..!
तू दिलेली सत्याची शिकवण
आज समस्त मानवजातीला 
प्रेरित करत राहते..!
"दुःखाचे कारण तृष्णा" सांगून 
जगाला दुःखमुक्तिचा 
मार्ग दिलास..!
ऐशोआराम त्यागून केवळ 
जगाच्या कल्याणासाठी 
यातना सोसणारा तू..!
या मटेरिअलिस्टिक जगात 
आजही तुझा तो त्याग आणि 
समर्पणभाव झळकत 
राहतो बघ लक्ख..!
प्रियदर्शी अशोका सारख्या 
कैक सम्राटाला तू नम्र केले,
त्यांना तलवारी 
सोडण्यास भाग पाडले..!
तू स्वतःला मार्गदाता संबोधतोस,
मोक्षदाता नाही तू सांगलेल्या 
मार्गक्रमणात समाधान आहे .!
मध्यम मार्गाचा तू 
दिलेला उपदेश किती 
संयुक्तिक आहे आजही..!
कशाला कुणाचं निमूट 
कबूल करायचं?
आपणच आपला प्रकाश 
बनावं नि वाट धरावी नीट..!
खरंतर मानवी बुद्धिला तू 
जोखडातुन मुक्त केलंस बापडया..!
म्हणूनच तर तू बुद्ध झालास..!

©आदर्श....✍️ #God
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

बरंच काही सुटलेलं
मनातलं मनात साचलेलं
सारं सारं कथन करू
लिहू तयास जोमाने..!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

खूप काही सोडून देऊ
कायम सारे हसत राहू
आलिंगन देऊ, सोबत राहू
साथ एकमेकांची देऊ धीराने ...!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

रटाळ गाणे सोडून देऊ
गीत नवे गात राहू..
विसरून सारे वाद कालचे
नवे संवाद पेरत जाऊ..
पुढे पुढे जात राहू पुन्हा जोमाने.!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने..!

©आदर्श....✍️ #Newyear2024
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

Year end 2023 बरंच काही सुटलेलं
मनातलं मनात साचलेलं
सारं सारं कथन करू
लिहू तयास जोमाने..!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

खूप काही सोडून देऊ
कायम सारे हसत राहू
आलिंगन देऊ, सोबत राहू
साथ एकमेकांची देऊ धीराने ...!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!

रटाळ गाणे सोडून देऊ
गीत नवे गात राहू..
विसरून सारे वाद कालचे
नवे संवाद पेरत जाऊ..
पुढे पुढे जात राहू पुन्हा जोमाने.!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने..!

©आदर्श....✍️ #YearEnd
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

एक होती इर्शाळवाडी..

कोणी सिनेमा बघण्यात
कोणी झोपायच्या तयारीत,
आई लेकरात,मित्र मित्रात,
कोणी प्रणयात तर कोणी 
गहन स्वप्नांत गुंग होते..!

रात्रीचे अकरा वाजले होते
सर्वजण आपापले कामे
आटपून नेमकेच सावरायला
लागले होते..!
डोंगराची आजवरची 
माया कोरडी झाली
दरड कालपर्यंत शोभून
दिसायची,
आज मात्र रागाने लाल झाली,
तिचा अहंभाव जागा झाला,
ती कोसळली भयाण रात्रीत 
बेचिराख केल्या अनेक कथा..!
स्वप्न थांबले,
हसू रुसले,
गाणे संपले,
आकांत वाढत होता.
वाचवा वाचवा चा सूर 
सर्वदूर गुंजत होता...!

©आदर्श....✍️ #Barsaat
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

एक होती इर्शाळवाडी..

कोणी सिनेमा बघण्यात
कोणी उद्याच्या तयारीत,
आई लेकरात,मित्र मित्रात,
कोणी प्रणयात तर कोणी 
गहन स्वप्नांत गुंग होते..!

रात्रीचे अकरा वाजले होते
सर्वजण आपापले कामे
आटपून नेमकेच सावरायला
लागले होते..!
डोंगराची आजवरची 
माया कोरडी झाली
दरड कालपर्यंत शोभून
दिसायची,
आज मात्र रागाने लाल झाली होती,
तिचा अहंभाव जागा झाला होता,
ती कोसळली आणि
भयाण रात्रीत बेचिराख 
केल्या अनेक कथा..!
स्वप्न थांबले,हसू रुसले,
गाणे संपले,
आकांत वाढत होता.
वाचवा वाचवा चा सूर 
सर्वदूर गुंजत होता...!

©आदर्श....✍️ #Barsaat
4db1636eb4f76c71a1de574a8b200716

आदर्श....✍️

मी भरकटत होतो
रस्त्याच्या बाजूने एकटा..
एक थांबा आला
तिथे चार चोर
वाटणी करत होते 
चोरीच्या मालाची...,
वाटणी झाली
जातांना काहीतरी पडल्याचा
आवाज झाला,
चोरी झालेले
काही तरी राहिले;
जे कोणाच्या वाट्याला गेले नाही
मी धावत गेलो
मला डस्टबीन मध्ये "एक पुस्तक"भेटले
मी ते वाचले 
आणि
शहाणा झालो...!

©आदर्श....✍️ #boat

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile