Nojoto: Largest Storytelling Platform
ashu2154012350090
  • 9Stories
  • 50Followers
  • 77Love
    0Views

Ashu

  • Popular
  • Latest
  • Video
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

संपले सारे तो काळही लोटला
सुटली साथ तुझी हाती पदर सुटला
झाल्या सांजवेळा संगे आठवणींचा झुला
आठवणींनी केला पापण्यांचा काठ का हा ओला
सांग ना रे...सांग ना रे #breakup
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

#OpenPoetry पाऊस
थेंबाने मातीचा सुगंध चहूकडे दरवळवणारा
निसर्गाला हिरवळीने बहरवणारा
बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा
धो धो कोसळणारा खुदकन हसवणारा
अंगावर शहारे आणणारा चिंब भिजवणारा
चहाचा घोट नवा वाटणारा कांदाभजीला चव देणारा
कागदाच्या होडीबरोबर वाहणारा
शाळेभोवती तळे साचून सुट्टी देणारा
खिडकीतून हळूच खुणावणारा
खोटे पैसे घेऊन खरा येणारा
सर्वाना हवाहवासा वाटणारा
प्रेमाला हाक देणारा
ओल्या नजरांना प्रेमात पडणारा
एकाच छत्रीत जवळ आणणारा
पाऊस .. #OpenPoetry #pahilapaus
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

शब्द तुझे पण थांबलेले शब्द माझे पण थांबलेले
बस पापण्यांच्या हलचालीतूनच शांततेचा दरवाजा उघड 
शब्द तूही वापरू नकोस शब्द मीही वापरत नाही 
डोळ्यांनीच sms पाठवू आणि डोळ्यांनीच receive करू #lovepoem
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

रंगात रंगुनी तुझ्या हरवले भान मी
तुझ्या हसण्यात स्वच्छंद झालो मी
डोळ्यात हरवून तुझ्या तुझे अंतरंग झालो मी
रंगात रंगुनी तुझ्या माझाच न राहिलो मी
स्पर्श तुझा अनुभवण्यासाठी होळीचा रंग झालो मी
तुझ्याच प्रेमरंगात रंगली मी
चिंब झालो मी, दंग झालो मी #lovepoem
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

रंग प्रीतीचा
रंगल्या क्षणांचा
उमलत्या स्पंदनांचा
प्रेमळ स्पर्शाचा
घट्ट मिठीचा
दोन मनाचा
सुंदर नात्यांचा
गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा #प्रेम #poetry
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

एक सुंदर नातं असावं 
निस्वार्थी भावनांचं
तुझ्या माझ्या मनाचं
निखळ मैत्रीचं
बोलक्या स्पर्शांचं
_आशू #प्रेम #स्पर्श #nojotomarathi
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

आयुष्य म्हणजे रोजच्या गोंधळळातून वेळात वेळ काढून कोणीतरी पाठविलेल hi वाचून गुलाबी झालेला चेहरा आणि त्यावर उमलेल स्मित हस्य. #आयुष्य
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज थोडी तशी चिडलेलीच होती मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते.
येताच पाऊस वाटतं
सोबत त्याच्या तूही यावस
चिंब भिजलेली तू
अलगद माझ्या मिठीत शिरावस
_अक्षय #ती #प्रेम #पहिलापाऊस
5edb0a6b176268a9f8e1a0caa556d51c

Ashu

#DearZindagi स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू
ओठावरील हसू तू
नजरेचा शोध तू
दिवसाची सुरुवात तू शेवटही तूच
शब्द तू, अर्थही तू
स्वप्नात पडलेलं क्यूट्स स्वप्न तू #प्रेम


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile