Nojoto: Largest Storytelling Platform
rahulnamde9260
  • 22Stories
  • 59Followers
  • 179Love
    0Views

Rahul Namde

गावरान मातीतला मराठी माणूस😎😎 twittre.com/@rahul_namde

Instagram.com/namde.rahul

  • Popular
  • Latest
  • Video
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा वेगवेगळ्या साच्यांचा बनलेला असतो;
आपण ठरवायचं असत कोणत्या क्षणी कोणत्या साच्यात फिट व्हायच.

                                           
                                                               _राहुल अशोक नामदे

©Rahul Namde #AWritersStory
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

काळीकुट्ट, अस्पष्ट , असली तरी,
ती रात्रच होती...
जीने माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच 
निर्णयात निस्वार्थ मदत केली.


                                   © राहुल अशोक नामदे #moonbeauty #
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

आखिर मौन कवटाळले मी तुझे, 
आणि शांत झाल्या
जित्याजागत्या पोपटी कळ्याही
रिकाम्या ओंजळीला तरीही,
फुलांचा भार माझ्या...
अन नकळत बरसल्या, 
हृदयातल्या पीपासू संवेदनाही... 

अलीकडे कोऱ्या पानांशीच
गुंज बोलवत असतो मी माझे,
जेव्हा इच्छाशक्तीला खायला उठतात
या लोभस लाटाही...
नवजात मनाच्या स्वैर स्वप्नांचा, 
पिसाराही तेव्हा अलगद फुले...
असतो उसास जेव्हा सांज कातरवेळी
त्या घट्ट मिठीचाही...!

                                        © राहुल अशोक नामदे
🌸🌸🌸
 💞🐥 #poem #Poetry #writingcommunity #kavita #marathi #Love #Life #Life_experience
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

आयुष्य हे आपलं असंच असतं,
कधी चढ लागतो तर कधी उताराच असतं
वळणावळणाच्या रस्त्यासारख नागमोडी असतं
आयुष्य हे आपलं असंच असतं...

कधी दु:ख झेलत कधी सुख कुरवाळत 
दबलेल्या अंकुरासारख पुन्हा उमलत असतं
आयुष्य हे आपलं असंच असतं...

आकाशा सारखं अमर्याद असत
रखरखत्या उन्हासारख तळपत 
रिमझिम पाऊसा सारखं अनंत बरसत असत
आयुष्य हे आपलं असंच असतं...

झाडांच्या पानांसारखं सळसळत असत
फुलपाखरांसम स्वच्छंदी होऊन हुंदडत असतं
सप्तरंगात विलीन होऊन डुंबत असतं
आयुष्य हे आपलं असंच असतं...

कधी वृंदावनातल्या तुळशी सारख नितळ, निर्मळ असतं
तर कधी फुलांसारख सदा बहरलेलं 
चंदन पटाच्या अत्तरा सारखं दरवळत असतं
आयुष्य हे आपलं असंच असतं...

भूतकाळातील अंधाराला झाकोळत असतं
आपल्या स्वप्नांच्या शिदोऱ्या पाठीवर घेऊन
वर्तमानातल्या प्रत्येक क्षणी नव्यान खुलत असतं
आयुष्य हे आपलं असंच असतं...

आयुष्य हे आपलं असंच असतं
शेतातल्या 'लव्हाळ्या' सारख अगदी चिवट 
कधी दु:ख झेलत, कधी सुखं कुरवाळत
अतुल्य असं भविष्य घडवत असतं!!
आयुष्य हे आपलं असंच असतं...!

                                                © राहुल अशोक नामदे #wait #poem #मराठी #Ka
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

आज म्हटलं काहीतरी लिहावं 
म्हणून 
शेजारी असलेली डायरी उघडली आणि
पेन हातात घेतला 
पेनानेच डोक खाजवत विचार करू लागलो
आणि त्यात गंमत म्हणजे 
परतीच्या पावसानं पुन्हा एकदा त्याच विषयाला 
हात घालायला भाग पाडलं...
आकस्मिक योगायोगचं म्हणावा लागेल काहीसा 
कारण तस कोणाचचं काही ठरलं नव्हतं
ना पावसाच ठरलं होतं ना माझंं

सुरवात केलीही लिहायला 
'ती' च्या खिळलेल्या आठवणीनी जणू चंग बांधलेला हृदयात
एक एक करून उतरवत होतो डायरी वर
त्या आठवणी एवढ्या गुंतलेल्या होत्या की
शब्दांची सांगड घालणही कठीण होत होतं
आणि  त्या आठवणींच्या गर्तेत इतका खोलवर जात होतो
याचा माझा मलाच अंदाज येत नव्हता
दगड समुद्रात फेकल्यावर तो किती खोल गेला त्याचा
अंदाज लावणं जेवढ कठीण अगदी तसचं कहीस झालेल

अगदी 'ती'ला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून ,
ते अगदी शेवटच 'ती'च्या बरोबर तळ्याकाठी बसलेलो इथपर्यंत
प्रत्येक क्षण अन क्षण एखाद्या चित्रफिती सारखा समोरून जात होता
आठवणींमध्ये रमण हे माझ दरवेळीचंच होत... 
लिहीता लिहीताच हात स्तब्ध झालेले
मनाने मला नकळत आधीच विषय भरकटून टाकलेला
मी अगदी तसाचं एखाद्या पुतळ्यासारखा बसलेला 
मगापासून अंगात भरलेली थंडीही आता जाणवत नव्हती
कारण अशावेळी येणारा रोमांच सगळ काही विसरायला लावतो

तेवढ्यात पाऊस बंद झाला आणि समोरचा वीजेचा दिवा लागला
आणि मीही सिनेमा प्रमाणे पूर्वजन्मातून बाहेर आल्यासारखं
'ती'च्या आठवणींच्या विश्वातून पुन्हा माझ्या भूमिकेवर आलो
तोवर पेनाच्या टोकावरची शाई सुद्धा सुकलेली तशीच
आणि परत त्या खिळलेल्या आठवणींना कागदावर खरडत बसलो #worldpostday #poem #Love
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

मै खाली किताब की खाली पन्नो सा 
तुम उसपे अपने खयाल लिख सकती हो क्या?

मै अपने प्यार में जान तक लूटाउंगा
तुम उतनी मोहब्बत कर सकती हो क्या...? #CalmingNature #हिंदी #Shayari 
#Quote  Harshada wakchoure रोहित तिवारी । Aisha Ranjeet 👉🎶 Lt Music 🎶 👈 (Tohid Mulla)

#CalmingNature #हिंदी #Shayari #Quote Harshada wakchoure रोहित तिवारी । Aisha Ranjeet 👉🎶 Lt Music 🎶 👈 (Tohid Mulla)

7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

रंगाळलेली  क्षितीजे सुद्धा 
रीतेपणाणी मश्गुल दिसतात

तु नसलीस तर...

पावसाच्या ओल्या सरींतही 
तो मखमली गारवा जाणवत नाही

तु नसलीस तर...

तहानलेल्या चातकाला ही 
पावसाच्या थेंबाची ओढ नसावी

तु नसलीस तर...

अंगणातला परिजातकही
सताड खिन्न दिसावा न दरवळताच

तु नसलीस तर...

चांदण्या रात्रीतही तो
बेजीव , जीवघेणा एकटा काळोखच दिसावा 

तु नसलीस तर...

तुझ्याशी बोलण्यास उन्मुक्त
असलेले थरथरणारे ओठही स्तब्ध व्हावेत

तु नसलीस तर...

अन,
माझ्या लेखणीतले शब्दही
चिरकाल उटावे पण अबोलचं रहावें

,तु नसलीस तर

             _rahul #DawnSun #poem #na 
#the
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

या व्याकूळ 
देहाला
साद दे तुझी
मंद 
मनी साठवून
आठवणींचे 
डोह
मुग्ध होई 
मन 
तरंग
या गंध वेड्या 
सरींना होऊदे
बेधुंद
नयनात रंगलेले 
माझे स्वप्न
तुझ्या
कुशीत बुडूदे
अखंड...!
                         _rahul #Love #poem #Wo
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

हम कोई फरिश्ते नहीं थे...
हमे समझना बहुत आसान था

लेकीन वो नवाब से कम नहीं थी...
समझना उनकी फितरत में नहीं था

                                _rahul #solace #shaayri #quarantine
7228ab3c46265f9091e90d6013dfc613

Rahul Namde

जनाब ! हम अपनो ने सिखे है 
की वक्त पर कैसे बदलना है.
वरना इस शराफत की दुनिया मै 
हम कब के लुट चुके होते... #Hindi #shayri #poem  
Aisha चौहान आकाश राणा

#Hindi #shayri #poem Aisha चौहान आकाश राणा

loader
Home
Explore
Events
Notification
Profile