Nojoto: Largest Storytelling Platform
mahesh1463525024947
  • 194Stories
  • 88Followers
  • 2.3KLove
    17.2KViews

Mahesh Mali

alone but "Happy"

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali


खूप मोठं स्वप्न आहे माझे
आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही ...!
देवाकडे काही मागायचे असेल
तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे, 
हा आशीर्वाद मागा. 
तुम्हाला स्वतःसाठी कधी काही 
मागायची गरज पडणार नाही !

©Mahesh Mali
  #hibiscussabdariffa
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

तुम्हाला तुमची सुंदरता नाही
तुमच चरित्र मोठ बनवतं.... 💫

©Mahesh Mali
  #essenceoftime
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

जगण्यासाठीचं एक उदात्त कारण असावं प्रत्येकाकडे म्हणजे मग रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या निराशा तुम्हाला नाराज करत नाहीत …
या जन्मावर ,या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ✨💯

©Mahesh Mali
  #loversday
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

"आयुष्याच्या वाटेवर निस्वार्थपणे जीव लावणारा जोडीदार सोबत असला की , आयुष्य पण छान जगता येतं..👫💕🥀

©Mahesh Mali
  #febkissday
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

आपला विचार आपणच करायचा

आपला विचार आपणच करायचा #मराठीविचार

82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

काळा पांढरा कोट,ॲार्डर- ॲार्डर, मिलॅार्ड या कोर्टात जाण्याआधी प्रत्येक माणसाकडे आपलं स्वतःच एक हक्काचं कोर्ट असावं .मनातला गुंता तिथे मांडता यावा आणि त्यावर न्यायनिवाडाही व्हावा..जुन्या काळात ही “कोर्ट”माणसं भरपूर भेटायची .थोडं मागे जाऊन पाहिलं तर कळतं अनेक वादविवाद वरिष्ठ अन् अनुभवी माणसचं सोडवायचे..झालेल्या निवाड्यावर प्रश्नही कुणी उभं करायचं नाही ..आताशा ही “कोर्ट माणसं “ कमी होऊ लागलीय आणि "कोर्ट कचेरी" वाढू लागलीय…बहुधा “माणसांचा माणसांवरचा विश्वास कमी होऊ लागलाय की काय…

©Mahesh Mali #hugday
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

प्रत्येक हसर्या चेहर्यामागे एक कुठे न सांगितलेली व्यथा असते…ती व्यथा खुप कमी माणसांकडे सांगाविशी वाटते…त्या कमी माणसांसारखं होता यावं..मनाच्या हळव्या कप्प्यांच्या जखमांवर थोडीतरी फुंकर घालता यावी .जगण्याच्या या धावपळीत असे “कान” होता यावं जिथे “अश्रू” मनमोकळे वाहतात💯✨

©Mahesh Mali #happypromiseday
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

प्रत्येकाच्या आयुष्याचा एक इतिहास असतो …इतिहास चांगला ,आनंददायी असेल तर रिव्हाइज करायला छान वाटतं ..इतिहास खूप सार्या अपडाऊन्सने भरला असेल तर मात्र जगण्याची दुखरी नस बनून जातो असा इतिहास रिव्हाइज करु वाटतं नाही ..त्याची पानं जेवढी बंद तेवढं जीवन जगणं सुकर वाटतं..कितीही नाही म्हटलं तरी इतिहास वर्तमानात डोकावतोच..💯✨

©Mahesh Mali #happypromiseday
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

खोटी शपथ घेऊन माणूस मरत नाही, पण ...मरतो तो विश्वास..!!

©Mahesh Mali #Happychocolateday
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

वास्तविकता समजून अपेक्षा करणं नेहमीच फायद्याचे ठरत असतं..

©Mahesh Mali #girlfriendproposeday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile