Nojoto: Largest Storytelling Platform
maulimauli2477
  • 3Stories
  • 16Followers
  • 269Love
    1.1KViews

sachin sukam

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

White उद्या कॅलेंडर बदलेल, विनाकारण कोणाला, माझ्या मनातून, माझ्या कर्मातून, आणि माझ्या बोलण्यातून कोणाला ठेच लागली असेल, तर प्रामाणिकपणे आपली मी  क्षमा मानतो...

(श्रीकृष्ण भगवान म्हणतात. 
कोणी कोणाच्या आयुष्यात विनाकारण येत नाहीत. काही ऋण संबंध असतात.)

मग जपायचं कोणाला, 
भलेही रागावतील, 
ओरडतील, रुसतील,
 पण तुम्हाला आपले समजतात, 
आपले मानतात, 
आयुष्य अनमोल आहे एकमेकांची साथ द्या,
 एकमेकांच्या पाठीशी खंबीर पणे  उभे रहा...
ज्यांच्याशी विचार जुळत नाहीत .
आपले विचार पटत नाहीत, 
येथून एक पाऊल मागे घ्या, 
कोणाचा मनामध्ये त्रास करून घेऊ नका ,
आणि कोणालाही त्रास देऊ नका ,
आपला रस्ता बदला.... आणि आपल्या आयुष्यात आनंद रहा...
जय जय राम कृष्ण हरी....

©sachin sukam #Sad_Status statuspoem
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

White ❤️  माणुसकी ❤️

लोकांचे सुख नाही समजले तरी चालेल, 
पण त्यांच्या वेदना समजल्या पाहिजे, 
हसऱ्या चेऱ्यामागील टेन्शन समजलं पाहिजे, 
त्यांच्या मनाची धडपड व्यथा समजली पाहिजे, 

एक  वेळ श्रीमंतीच्या यादीत नंबर नाही बसला तरी चालेल, 
पण माणुसकीच्या यादीत नंबर बसला पाहिजे, 
लोक ब्रॅण्डेड कपड्याने, सुंदर चेहऱ्याने ओळखत नाहीत, 
सुंदर मनाने आणि स्वभावाने ओळखतात, 

शेवटी काय हो.....
माणूस म्हणून नाही जगला तरी चालेल, 
माणुसकी म्हणून जगता आलं पाहिजे..

कवी मन झाले शब्दातून शब्द आठवले, 
सचिन सुकम

©sachin sukam #love_shayari poem मराठी कविता प्रेम

#love_shayari poem मराठी कविता प्रेम #मराठीकविता

b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

White आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होतो की, आमच्या  इथे दिनांक=07-09-24 वार= सोमवार ते दिनांक=17-09-24 वार= मंगळवार या दिवशी  गणेशोत्सवाचे अवचित साधून, 13 -09-24 वार शुक्रवार  या दिवशी श्रीहरींची (सत्यनारायण देवाची)  सेवा ही आयोजित केली आहे , सर्वांनी सहकुटुंब व सहपरिवार येण्याची कृपा करावी.. व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती..

कार्यक्रमांची रूपरेषा 
सकाळी 10:00 वाजता श्री गणपती बाप्पा चा अभिषेक 

11:00 वाजता श्रीहरींची पूजा 

दुपारी 1:00 ते 3:00 श्रीहरींचा महाप्रसाद 

कार्यक्रम 
रात्री ठीक 8:00 ते 9:30 प्रवचन (श्री ह भ प रामदास नामे पालु )

ठीक रात्रि 10 ते 12 भजन {विट्ठलवाड़ी दाभोले)

आपले नम्र 
सुकम बंधू

©sachin sukam
  #Ganesh_chaturthi poem
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

White आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होतो की, आमच्या  इथे दिनांक=07-09-24 वार= सोमवार ते दिनांक=17-09-24 वार= मंगळवार या दिवशी  गणेशोत्सवाचे अवचित साधून, 13 -09-24 वार शुक्रवार  या दिवशी श्रीहरींची (सत्यनारायण देवाची)  सेवा ही आयोजित केली आहे , सर्वांनी सहकुटुंब व सहपरिवार येण्याची कृपा करावी.. व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती..

कार्यक्रमांची रूपरेषा 
सकाळी 10:00 वाजता श्री गणपती बाप्पा चा अभिषेक 

11:00 वाजता श्रीहरींची पूजा 

दुपारी 1:00 ते 3:00 श्रीहरींचा महाप्रसाद 

कार्यक्रम 
रात्री ठीक 8:00 ते 9:30 प्रवचन (श्री ह भ प रामदास नामे पालु )

ठीक रात्रि 10 ते 12 भजन {विट्ठलवाड़ी दाभोले)

आपले नम्र 
सुकम बंधू

©sachin sukam
  #Ganesh_chaturthi poem
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

White मेहनत जास्त करून,थोडेसे कमी गुण मिळाले म्हणून, 
नशिबाला दोष देतोस की काय?
केली होतीस तू जीवाची काया,
म्हणून तू अपयशी झालास  काय ?

बोलतील तुलाही वेड्या आता काहीजण टोचून,
 ते मनामध्ये ठेवायचं नाही,
आयुष्याच्या एका प्रवासाने
खचून जायचं नाही,

ठेव थोडा मनामध्ये धीर,
 यातूनही तू बाहेर येशील, 
पुढच्या वेळेला तू तुझ्या यशाने उत्तर देशील,

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, 
तुझ्या कुटुंबाचा आधार,

                ♥️कवी मन झाले, शब्दातून शब्द आठवले...♥️

©sachin sukam
  #Free poem
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

एक प्रॉमिस आपल्या  माणसांना , 
नेहमी तुमच्या सोबत आहे.... 
आपले नाते कधीच सोडणार नाही...
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ...






कवी मन झाले,.....

©sachin sukam #happypromiseday poem
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

ज्यांना परिस्थिती जाणीव असते
जानी यशाचा मार्ग शोधला आहे,
ते इतरांचा तिरस्कार कधीच करत नाही,
जर तुम्ही त्यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं,
तर ते स्वच्छ मनाने मार्गदर्शन करतात...

         ह भ प रामदास कृष्णा नामे,

©sachin sukam
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

बाबांसाठी काय status लिहणार, 

आज माझा जे काही status आहे.

 तो बाबा तुझ्यामुळेच आहे

©sachin sukam
  #FathersDay
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

गावदेवीचा शिमगा

गावदेवीच्या होळीला जाऊया चला,
शिमग्याच्या या सणाला तिला भेटूया चला,

सडा ,रांगोळी काढून घराची सजावट करू,
गावदेवीच्या आगमनासाठी फुलांचा वर्षाव करू,
गावदेवी आपल्या घरी आली आहे पहा,
आतुरतेने आपली वाट पाहत आहे पहा ,


शिमगा हा कोकणचा सण आहे मोठा,
देवीची पालखी नाचवण्यात वेगळीच मजा,
लहान मोठे गावदेवीला  साकडे हो घालतात,
दिंड्या पताका पालखी घेऊन घरोघरी जातात,



शिमगा उत्सव मोठ्या हर्षाने साजरा करतात,
 ओठ्या ,नारळ भरून नृत्य ,भजन करून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात,
गावदेवीच्या आगमनाने स्वर्ग जणू जमिनीवर येतो,
तिच्या पावन स्पर्शाने कोकण स्वर्गमय होतो,


 पंधरा -सोळा दिवसांनी देवी राजगणात जाते,
झालेली सेवा पाहून स्वतः अश्रू  गाळते,
भक्तांपेक्षा तिलाच जास्त लगबग लागते,
कधी वर्ष होईल आणि पुन्हा येईल असे तिला होते,
गावदेवीच्या होळीला जाऊया चला.....

सर्व कोकण  वाशीयांना समर्पित
कवी मन झाले शब्दातून शब्द आठवले,
सचिन सुकम

©sachin sukam
  poem
b2716d1eccb588d2874de3a13b4590a3

sachin sukam

गावदेवीचा शिमगा

गावदेवीच्या होळीला जाऊया चला,
शिमग्याच्या या सणाला तिला भेटूया चला,

सडा ,रांगोळी काढून घराची सजावट करू,
गावदेवीच्या आगमनासाठी फुलांचा वर्षाव करू,
गावदेवी आपल्या घरी आली आहे पहा,
आतुरतेने आपली वाट पाहत आहे पहा ,


शिमगा हा कोकणचा सण आहे मोठा,
देवीची पालखी नाचवण्यात वेगळीच मजा,
लहान मोठे गावदेवीला  साकडे हो घालतात,
दिंड्या पताका पालखी घेऊन घरोघरी जातात,



शिमगा उत्सव मोठ्या हर्षाने साजरा करतात,
 ओठ्या ,नारळ भरून नृत्य ,भजन करून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात,
गावदेवीच्या आगमनाने स्वर्ग जणू जमिनीवर येतो,
तिच्या पावन स्पर्शाने कोकण स्वर्गमय होतो,


 पंधरा -सोळा दिवसांनी देवी राजगणात जाते,
झालेली सेवा पाहून स्वतः अश्रू  गाळते,
भक्तांपेक्षा तिलाच जास्त लगबग लागते,
कधी वर्ष होईल आणि पुन्हा येईल असे तिला होते,
गावदेवीच्या होळीला जाऊया चला.....

सर्व कोकण  वाशीयांना समर्पित
कवी मन झाले शब्दातून शब्द आठवले,
सचिन सुकम

©sachin sukam poem
loader
Home
Explore
Events
Notification
Profile