Nojoto: Largest Storytelling Platform
samruddhi4043
  • 7Stories
  • 14Followers
  • 87Love
    858Views

Samruddhi

poetry is my life..... its my way to explain my feelings.....10

  • Popular
  • Latest
  • Video
cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

For me
 Nothing is more important than you
 Nothing is more fascinated than you 
Nothing it's more beautiful than you
 The way you come in my life 
No one can came like you
 
You are caring more than you show 
You are glowing more than you glow
 I can't stop my self the way you flow
 I just remember one thing
 I love you more than that you know 

 I wont expect anything from you 
I know i cant marry with you
I just want to take care of you 
I would love to stay happy with your memories 
Because your memories are sweetest than you

©Samruddhi For me....
#love#poetry#emotions#hobby

For me.... love#Poetry#Emotions#Hobby

cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

नभ उतरले अंगणी तुझ्या सवे पाऊस घेऊन 
तुही ये प्रिये आता ओली चिंब होऊन 
धरू नको लाज उरी कसली केस मोकळेच राहुदेत 
तुझ्यासम यांनाही आज पाऊसाला पाहुदेत 
मनमोहक रूप तुझे आज सरींनीच टिपले 
उतरता देहावरून लागे जणू मोती बरसले
गालावरच्या या थेंबांना हलकेच खाली ओघळूदे
लागेल शर्यत त्यांचीही ओठास भेटायला 
थोडी वाट त्यांनाही पाहुदेत 
केसातला गजरा जाईचा बघ नव्याने बहरला
भेटण्या तुला हा मेघ पाऊस बनून बरसला 
उतरताना या सरींचे मिलन थेंबांशीही झाले 
होता एकरूप त्या थेंबात गगनी इंद्रधनू उभरले 
किलबिलाट पक्ष्यांचा जणू नवे सूर गवसले
लखलखाट होता बिजलीचा आभाळी नवे चांदणे उमगले 
धीर आता कसला मना सामने तुझीच प्रतिमा कायम 
घेतला हात हाती तुझा सोडून सारा धीर अन संयम 
नको आता मोह कसला मन तृप्त झाले भिजून 
तुही ये सखे आता ओली चिंब होऊन.....

©Samruddhi भेट पावसातली
#rainfall#love#marathi poem#hobby#love rain

भेट पावसातली #rainfalllove#marathi poemhobbylove rain #Poetry

cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

#Sadmusic #sadpoetry #poetry #sad #love #poetrycommunity #poetrylovers #shayari #quotes
cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

सुगंध तोच पारिजातकाचा तिच्या येण्याने भासला नवा 
नवे गीत नवे सूर तिच्या स्वागतास करी तयारी पक्ष्यांचा थवा 
सुमधूर नाद पैंजणांचा ऐकण्यास हा आसमंत सारा 
ऐन वेळी ऋतू बरसला उगवावा जसा दिवसा शुक्रतारा 
करी केविलवाणी आर्त वसंत पसरू दे आता फुलांचा सडा 
तिच्या येण्यानेच स्तब्ध झाले मी माझे मन आणि हा वाडा 
नजर भिडली धडकन वाढली हृदयी जश्या सागराच्या लाटा 
बिलगून तीला शांत कराव्या पसरणाऱ्या या हवेच्या वाटा
कोणालाही खबर न लागो की तिचे येणे झाले वाड्यावर
सारे जमतील घेऊन तोंहफे ते तर घायाळ तिच्या नजरेवर 
काय करू कसे करू आता चित्त नाही थार्‍यावर 
परत येईन नक्की हे शब्द अखेरचे
तेव्हापासुन नजर,फक्त तिच्या वाटेवर.....

©Samruddhi भेट जिव्हाळ्याची....
#marathi #marathikavita  #marathitrol #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture #marathilove
cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

जिवलगाहूनही प्रिय मित्र तू समृद्धीचा 
शांत सुशील निरागस तू निखळ हास्याचा..
शब्द सारे उभारले आज तुझे कौतुक करण्यासाठी 
अरे नेहमी तूच म्हणायचास समृद्धी एक कविता कर माझ्यासाठी....
का बांधू नये मी सांग सारे कौतुकाचे बांध 
कोणतीच आशा उरी नाही तू इतका प्रेमळ का सांग..
भेट झाली नकळत आपली NSS चा तो कॅम्प 
त्यानंतर मात्र आपल्या मैत्रीचे ट्राफिक जाम..
विचारही केला नव्हता की तू इतका चांगला मित्र बनशील 
मी चार दिवस reply न करूनही पुन्हा तूच msg करशील.. 
प्रत्यक्षात कधी बोललो नाही जास्त ना कधी Wtsp वर 
मैत्रीत गोडवा मात्र तोच जसे साजूक तूप पोळीवर.. 
काय लिहू किती लिहू काहीच कळत नाही 
समीर...तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाच्या नशिबात नाही.. 
हाच हात दोस्तीचा तुझा खूप साथ देतो 
तू भले सोबत नाही पण तुझा आभास नेहमीच असतो..
कित्येक जन्म लागतील तुझा विसर पडायला 
पण प्रत्येक जन्मात समीरच असेल समृद्धीच्या सोबतीला..

©Samruddhi
   #marathimeme #marathiinspirations #mimarathi #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture
cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

खुली किताबों के पन्ने है हम
हवा ने छु लिया तो उङने लगे
पानी ने अपनाया तो बेहेने लगे
आग ने पनाह दि तो जलने लगे
प्यार से देखा तो दिल बन गये
कलम ने छू लिया तो शायरी बन गये
उसके होठो ने चुमा तो याद बन गये
उसने इंतजार किया तो खत बन गये
उनके आँसूओंका सहारा बन गये
तलब उठी मेरे दिदार कि तो तसबीर बन गये
न जाने उनके इश्क़ मे हम क्या क्या बन गये
पास आने का मौका उन्हाने तो नही दिया 
पर किताब बनकर ही सही हम उनके सिने से लपेट गये

©Samruddhi
  एक पन्ना
#dilkibaat #2liners #shyari #gulzar #mohabbat #shayarana #loveshayari #gazal #shayar #shayri
cefc3b2451020351abcefe0762a9d98b

Samruddhi

उधळलेल्या वार्‍याला आज बेभान होताना पाहिल..
तिला पाहिलं असेल का त्याने....नाही... कदाचित स्पर्श केला असावा अलगद,तिला न कळता अन झाला असावा बेधुंद....तसा तिच्या नजरेच्या ओघात मीच होतो.. भिरभिरणारी ती नजर माझ्याच वाटेकडे होती..मी दुरून पाहत होतो....आता तिच्या नजरेस नजर मिळणार इतक्यात तिने नजर खाली झुकवली....त्या बेधुंद वार्‍याने नकळत तिच्या डोळ्यात धूळ उडवली होती...तिला होणारा त्रास बघून मी धावतच तिच्या जवळ गेलो....आजवर तिच्या जवळही न बसणारा मी तिच्या अगदी समोर बसलो... मी आल्याची जाणीव तिला झाली..अलगद तिच्या डोळ्यावर येणार्‍या केसाच्या बटा बाजूला सारल्या... दोन्ही हातांनी घाबरतच तिच्या पापण्या उघडल्या...आज पहिल्यांदा इतक्या जवळून मी तिच्या डोळ्यात पाहिले...अश्रूंनी भरलेल्या काळ्याभोर डोळ्यात आज मी स्वतःलाच पाहिले..कदाचित हा वारा आज बेधुंद झाला नसता तर हे शक्य नव्हत..याची जाणीव मला झाली आणि मनातल्या मनात मी त्या वार्‍याचे आभार मानले..खरच..आज तिच्या डोळ्यात मला माझे सुख गवसले....

©Samruddhi
  अनोखा वारा 
marathi #marathikavita #maharashtra #marathistatus #marathimulgi #marathimulga #ig #marathijokes #


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile