Nojoto: Largest Storytelling Platform
samadhannavale2397
  • 19Stories
  • 381Followers
  • 1.3KLove
    15.6KViews

Samadhan Navale

poet

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

White ©samadhan patil Navale
गेले ते जुने वर्ष आता,
होतोय मनी हर्ष  आता ||
दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे
असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे,
करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची
परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता

गेले ते जुने वर्ष आता ||

झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु
काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू,
गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ
संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ
करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता

गेले ते जुने वर्ष आता ||

"नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा
आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा,
होऊ नका देऊ कधी,घात कुणाच्या विश्वासाचा
संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे
लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे,
गौरवशाली इतिहासाची, पुज्य आपली भारतमाता
गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता ||

©Samadhan Navale #Sad_Status  मराठी कविता संग्रह

#Sad_Status मराठी कविता संग्रह #मराठीकविता

f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

Unsplash please support my Facebook account

https://www.facebook.com/share/p/15da5Mgzmc/

©Samadhan Navale #leafbook #suport #mylifebook
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

White कधीकधी निराशेच्या ढगांनी, आशेचे आकाश झाकाळते

तेव्हा विचाराच्या प्रकाशाने अंतर्मन उजळून निघावे,

आणि शब्दांच्या तेजपुंज किरणांनी

निराशेचे ढग आरपार छेदून

कवितारुपी प्रकाशमान पहाट व्हावी.

जरी मग दिवसभर लागले झेलावे चटके,

स्वप्न अपूर्तीचे, निरर्थक वाटणाऱ्या जीवनाचे

तरीही घामाचे रूपांतर कवितेत व्हावे,

नसले प्रभावी पण शब्दात जरी

अथवा न मिळो प्रसिद्धी तरी..

त्या अशक्तपणातही सशक्त असा अर्थ असावा,

प्रत्येक मानवी मनाची असावी गरज..

कविता आणि काव्य

तरीही न होता निखळ मनोरंजन

अनुभवाचाही त्यात परिपाक असावा,

निराशेत-आशेत दुःखात आनंदात

जीवनाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या वळणावर

जरी शाश्वती नसली जिंकण्याची

जीवनाच्या रणांगणावर,द्वेष, वैैर,मत्सर या आत्मशत्रूंना

तरीही धरून हात कवितेचा, मनी विजयश्रीचा ध्यास धरावा

महत्त्व वर्णिल्याने कदापि होत नाही कमी

तीच तर असते खऱ्या कवितेची हमी

रसिकांची डोळस.. नसते त्यांना कमी

सर्वच असतो आपण रसिक, पण...

मिळत नसते कलात्मक दृष्टी,

तेव्हा शिरून विश्वात कलेच्या, मनाला छंद कवितेचा जडावा

©Samadhan Navale #Sad_Status  मराठी कविता

#Sad_Status मराठी कविता #मराठीकविता

f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

White कधीकधी हात मोकळा करून.. 
सोडून द्यावीत नाती, 
कवटाळून धरल्याने, कोणी आपलं होत नसतं!

©Samadhan Navale #sad_quotes
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

लोकांचे खरे रूप जर आपल्याला ओळखायचे असेल तर
 त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे..
जे तुमच्या अडचणीच्या काळात 
मदतीचा हात न देता "खेळ" म्हणून 
मजा घेत असतील तर समजून जा
 तुम्हाला यांच्यापासून सावध 
व्हायची गरज आहे !

©Samadhan Navale
  #Sawera
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

तेरी शहर की हवा से अब
मूह मोड लिया करते है,
जिंदगी में कभी कभी ऐसे
अनचाहे मोड भी आया करते है |

©Samadhan Navale #CityWinter
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#निजामशाही
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#अंत्ययात्रा
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#वाह_रे_नसीबा...
f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#शिकवा #LOVEGUITAR
loader
Home
Explore
Events
Notification
Profile