Find the Latest Status about नामदेव महाराज अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नामदेव महाराज अभंग.
balaji boinwad
तुकाराम महाराज अभंग!!१!! समचरण दृष्टि विटेवरी साजिरी! तेथे माझी हरी वृत्ती राहो!!१!! आणिक न लगे मायिक पदार्थ! तेथे माझे आर्त नको देवा!!२!! ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी। तेथे दुश्चित झणी जडो देसी!!३!! तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म!जे जे कर्मधर्म नाशवंत!!४!! © balaji boinwad #तुकाराम महाराज अभंग
Lokesh Late
धन्य ते अरण रत्नाची ती खाण । जन्मला निधान सावता तो।। सावता सागर प्रेमाचे आगर। घेतला अवतार माळिया घरी।। धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता। साठविला दाता त्रैलोक्याचा।। नामा म्हणे ज्याचा जन्म सफळ झाला। वंश उद्धारिला माळियाचा।।. - संत नामदेव महाराज संत नामदेव महाराज #वारी #संत सावता महाराज
Archana Pol
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह। संसाराचा मोह । सुटो आता ।।१।। नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।। वासनेचा जाळ । आगीचे मोहळ देहाचा विटाळ । जळो आता ।।३।। भावनांचा खेळ। सुखाचे साधन गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।। भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा संतसंग जीवा । जडो देवा ।।५।। तुझीया भेटीने । उजळो जीवन हरपावे भान । आनंदाने ।।६।। ©Archana Pol अभंग
vaishali
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼 मनमंदिरात | तूच आहे देवा || सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| कर जोडुनिया | तुला विनविते || साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे || आहे हे सांगणे | तुजपाशी ||३|| कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || दरवळे गधं | चोहीकडे ||४|| तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ || साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५|| 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #