Nojoto: Largest Storytelling Platform

New सांजवेळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांजवेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांजवेळी.

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

सांजवेळी

read more
सांजवेळी 

अशा उदास सांजवेळी बसून मी अाहे 
जुळले सूर तरीही मैफिल उदास अाहे ....

गेलास असा कसा तू टाकुनी पैलतिरा
सोसू कसा इथे मी एकांती हा दुरावा 
येशी पुन्हा फिरोनी ही आस उरात अाहे ....

सांगावयास होते विसरू कशी तुला मी 
हरवून स्पर्श गेले ते शोधू कुठे तया मी 
पाऊस आसवांचा नयनी झरून अाहे ....

झाली अशी कशी ह ताटातुटी जीवांची 
ठेवू अभंग प्रीती ही होती आस मनांची 
कहाणी सरून गेली जीवनी निराश अाहे ....
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापू

©Shahaji Chandanshive सांजवेळी

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांजवेळी... #सांजवेळी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating w

read more
सांजवेळी
 सोबत तुझ्या वेळ घालवायचा आहे अश्या सांजवेळी
तुला ऐकवून दाखवायच्या आहे माझ्या मनातील चारोळी

तुझे हे रूप जशी दिसते साधी भोळी
अजूनच खुलूनी दिसते सांजवेळी

सोबत तुझ्या कायम राहायचे आहे सारूनी हे दिवस विरहाचे
तुझ्या सोबत गप्पा गोष्टींची मेफील करायची आहे मनमोकळी अश्या या सांजवेळी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सांजवेळी...
#सांजवेळी१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collaborating w

vishnu thore

अशा सांजवेळी... #5LinePoetry

read more
#5LinePoetry ............

©विष्णू थोरे अशा सांजवेळी...

Archana Bhagat Bhoyar

सांजवेळी #Strings

read more

Malati Bhaskar semale

कधी सांजवेळी

read more
कधी सांजवेळी 

येशील का सख्या तू ,कधी सांजवेळी 
आतुर मी,जाहले ,भेटीस या सांजवेळी।।ध्रु।।

चाहुल कळता हळूच उठते
दुरून बघता , मनात हसते 
अधिर होऊन तू ही यावे अशा सांजवेळी 
आतुर मी जाहले ,भेटीस या सांजवेळी।। 1।।

दिवस ढळला, अंधार पडला 
मनात ठसला, ऊरात बसला 
लगबगीने धावत यावे अशा  सांजवेळी 
आतुर मी,जाहले ,भेटीस या सांजवेळी।। 2।।

धावत येता, कवेत घेना
हात धरोनी, प्रित फुलवना 
मिठीत घ्यावे हळूच मजला अशा सांजवेळी 
आतुर मी जाहले ,भेटीस या सांजवेळी।। 3।।


सौ मालती बी सेमले (स.शि)
शाळा मोखाळा, 
प.स.सावली,जि.चंद्रपूर कधी सांजवेळी

Ar. Mitwa Shrivastav

सांजवेळी.... #Light

read more
सांजवेळी 

घुटमळते मन 
दारात तुझ्या 
सांजवेळी...! 
        जुन्या जखमा 
        काढतात खपली 
         सांजवेळी...!
मोहरे निशीगंध 
परसात तुझ्या 
सांजवेळी..
©️®️मितवा श्रीवास्तव (आर्किटेक्ट)

©mitwa shrivastav सांजवेळी....

#Light

vishnu thore

अशा सांजवेळी #5LinePoetry

read more
#5LinePoetry आशा सांजवेळी तुझी याद येते
मनाच्या तळाचा कुणी ठाव घेते
किती वाहते सावध हे पाणी
जेव्हा ऐन वेळी तुझे गाव येते..

©विष्णू थोरे अशा सांजवेळी

#5LinePoetry

vaishali

#सांजवेळी# मराठी कविता#

read more
सांजवेळी मनात माझ्या
दाटुनी आल्या जुन्या आठवणी
भातुकलीच्या खेळामध्ये
आपण दोघे राजा राणी

भातुकलीच्या खेळामध्ये
संसार होता थाटला
दोघांनाही भानच नव्हते
हा तर खेळ आहे आपला

खोटे खोटे राजा राणी
एकदिवस दूर दूर ते झाले
जाता जाता एकमेकांच्या 
डोळ्यात पाणी ठेऊन गेले

डाव मोडला भातुकलीचा
उरल्या फक्त आठवणी 
सांजवेळी आठवली 
मज जुनी प्रेम कहाणी
------------------------------- #सांजवेळी# मराठी कविता#

Avinash Shinde

सांजवेळी तुझ्याभेटी मधील एक रचना

read more

Deepak Shinde

त्या गर्भाळ सांजवेळी..... _दिपक शिंदे

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile