Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांजवेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांजवेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसांजवेळ कविता, सांजवेळ अर्थ, सांजवेळी चारोळी, सांजवेळ चारोळी, कधी सांजवेळी,

  • 12 Followers
  • 18 Stories

Shankar Kamble

चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली
थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली..

सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे
गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे..

क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी
तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी..

जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे
मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे..

सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे
धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे..

©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी

Rajendrakumar Jagannath Bhosale

Shankar Kamble

वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी
भार दाटला पुन्हा ढगाला डोळ्यांत पाऊस मागतो मी

पेटलेल्या उन्हांत आता झाड सोसते तप्त झळाला
आठवून मग उंबऱ्याला जीव उगां का जाळतो मी?

मतलबी दुनियेत होते पायपुसणी भाबड्याची
कातडी जपतो स्वतःची पारखून जग वागतो मी

टांगली कित्येक स्वप्ने का नव्याने न्याहाळतो?
देवून चकवा पांगलेल्या पाखरांना भांडतो मी

माखलेल्या गर्द हळदीचा गंध  ना लाभला
रंगल्या मेहंदीतल्या हातांस दूर पाहतो मी

सळते जीवांला जाळतेही पुन्हा पुन्हा ती सांगते ही
भंगलेल्या राऊळाच्या पायरीला थांबते मी 

उघड्यावरचा असा पसारा आज वाटतो आवरावा
गाठोड्याचा भार शिरावर मूकपणाने चालतो मी

©Shankar Kamble #Past #गझल #वेदना #दुःख #जीवन #जगणे #जगणं #सांजवेळ

Rashmi Hule

कातरवेळी मी तिथेच पहात होतो वाट
आठवांचे काहूर मनात उठले होते दाट
सुर्य ही हळूहळू अस्ताला कलत होता
अपसुकच एक एक अश्रू ढळत होता
दुर तु ही जाऊ पहात होतीस, मग
निरोपाची वेळ तु ही का टाळत होतीस?? 
 #तु#मी#सांजवेळ
#yqtaai #yqbaba #yqdidi#yqtales #bestmarathiquote

Rashmi Hule

Meaning :- धुंद शाम का पहर हैं, ठंडी हवा चल रहीं हैं, पंछी घर जा रहें है, ऐसे में तेरे मखमली स्पर्श की चाहत लिये अकेला ही हू यहां... #अकेला #सांजवेळ#yqtaai #yqdidi #yqbaba #yqtales #bestyqmarathi #bestyqmarathiquotes

read more
सांज वेळ आणी धुंद गार वारा
सुर्य अस्तास जाता पाखरा निवारा
स्पर्श मखमली तुझा हवाहवासा
एकटाच इथे मी, सोडीतो उसासा... 
              Rashmi 

 Meaning :- धुंद शाम का पहर हैं, ठंडी हवा चल रहीं हैं, पंछी घर जा रहें है, ऐसे में तेरे मखमली स्पर्श की चाहत लिये अकेला ही हू यहां... 
#अकेला 
#सांजवेळ#yqtaai #yqdidi #yqbaba #yqtales #bestyqmarathi
#bestyqmarathiquotes

Shankar Kamble

दिस ढळतीला आला
          सांज पेंगुळ्या सावल्या
ओढ्याकाठी बनांमध्ये
           हरिणी त्या थबकल्या

रंग शेंदरी, केसरी
           पखरण रानोमाळ
मनां कसलं गारुड?
            घाली रिंगण भोवळ 

रानपाखरांचा थवा
             दूर ढगांत पांगला
वाट चुकूनी एकला
             राघू एकाकी थांबला

उगां लावी जीवां घोर
             वेळ कातर कसली?
खूर उधळीत धूळ
             जशी काजळी बसली 

नाच नाचणाऱ्या लाटा
            जणू भानावर आल्या
पायी सोडून घुंगरू
            कुठे विरहिणी गेल्या?

मूख मलीन कळ्यांचे
            गंध कसा हरवला?
आस लागे भ्रमराची
            मधु संग दुरावला

©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू

Shankar kamble

Kailas Tidke

#MusicLove

read more
कवितेसमोर कवितेला 
सुरात गुंफायचय../
एखाद्या सांजवेळी 
तूझ्यासमोर मुक्तपणे गायचंय...//
©®कैलास
#सांजवेळ

©Kailas Tidke #MusicLove

Shabdrangi_Fulpakhru

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile