Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांजवेळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांजवेळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कधी सांजवेळी, सांजवेळी ची गाणी, सांजवेळी चारोळी, ओल्या सांजवेळी, सांजवेळी,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पेटून कशी उजळेना... #पेटूनकशीउजळेना चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #yqmarathi #सांजवेळी

read more
       सांज तु जशी पेटुन उठली ज्वाळा तप्त .....
रूपाने तुझ्या गुंतलेलो जसा मी का बघत तुझा अंत.....
ओळींत माझ्या तु नटलेली प्रखर आनंदाची मालिणी.....
  ‌   प्रवास सोबतीचा दुरवरची तु पाहुणी...
सागर सुख तु ममप्रियत्वाची गोंधळलेल जाळ सार तु रेंगाळलेल.....
    ओठ बोलके माझे तुझ्यात सारें गुंतलेलं.....
पाठ फिरूनी कोणत्या स्थायी निघाली.....
     पेटलेली सांज कुठवर पसरली.....
सोबतीला सुर्य तु ,अंगाला त्याच्या विस्कटलेली....
    रूप ज्वाळाचे पाहण्या तु कोठे हरवलेली.....
स्वप्नी माझ्या बोल तुझे ओळींत गुरफटलेले.....
    रूद्र रूप जणु पेटलेला तप्त विखारा.....
पेटली चौदिशे कुठवर अजुन कशी उजळेना....
     पालटलेली तु चारही दिशा शोधण्या निघाला.....
पितांबराचा तुकडा पेटुनी जसा फेकलेला.....
      कुठवरचा क्रमण तुझ काही कोडे ते उलगडेना....
रवि सोबताचा तुझा कुठे लपवला.....
    शब्दांत विरघळलेल्या तुझे काही विस्तवाचे खडे.....
पेटुनी रूप सार तुझ कसं ऊजळना......
    ‌‌पेटली ज्योत सारी सांज तुझ्यात कसा भडक चटका....
      पेटुनी रूप तुझ काही मिटेना....
     
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पेटून कशी उजळेना...
#पेटूनकशीउजळेना

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

vaishali

#सांजवेळी# मराठी कविता#

read more
सांजवेळी मनात माझ्या
दाटुनी आल्या जुन्या आठवणी
भातुकलीच्या खेळामध्ये
आपण दोघे राजा राणी

भातुकलीच्या खेळामध्ये
संसार होता थाटला
दोघांनाही भानच नव्हते
हा तर खेळ आहे आपला

खोटे खोटे राजा राणी
एकदिवस दूर दूर ते झाले
जाता जाता एकमेकांच्या 
डोळ्यात पाणी ठेऊन गेले

डाव मोडला भातुकलीचा
उरल्या फक्त आठवणी 
सांजवेळी आठवली 
मज जुनी प्रेम कहाणी
------------------------------- #सांजवेळी# मराठी कविता#

Shankar Kamble

दिस ढळतीला आला
          सांज पेंगुळ्या सावल्या
ओढ्याकाठी बनांमध्ये
           हरिणी त्या थबकल्या

रंग शेंदरी, केसरी
           पखरण रानोमाळ
मनां कसलं गारुड?
            घाली रिंगण भोवळ 

रानपाखरांचा थवा
             दूर ढगांत पांगला
वाट चुकूनी एकला
             राघू एकाकी थांबला

उगां लावी जीवां घोर
             वेळ कातर कसली?
खूर उधळीत धूळ
             जशी काजळी बसली 

नाच नाचणाऱ्या लाटा
            जणू भानावर आल्या
पायी सोडून घुंगरू
            कुठे विरहिणी गेल्या?

मूख मलीन कळ्यांचे
            गंध कसा हरवला?
आस लागे भ्रमराची
            मधु संग दुरावला

©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू

Sanjay Gurav

mute video

RJ कैलास नाईक

#सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती मावळतीची सारी किरणे मंतरली होती वादळे मनातली सांगून जातात मला ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती

read more
सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी
स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती

अप्रूप किती सांगू तुला नात्यांचे कैलास 
ती नसल्यावर लेखणी थरथरली  होती

मळभ दूर सारून इंद्रधनू  पसरताना 
प्रीत नव्याने चांदण कुशीत बहरली होती
           RJ कैलास #सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी
स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile