Find the Latest Status about श्रावण मोंठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावण मोंठ.
suresh pawar
आठवणींच्या धाग्यात मी पावसाला विणावे माझ्या ओल्या पापण्यांना मग तू श्रावण म्हणावे सुरेश पवार #श्रावण
surajkumaregoswami
श्रावण = बहर श्रावण= लहर श्रावण =सर श्रावण =हर्ष श्रावण =आनंद श्रावण = उत्सव श्रावण =उत्साह श्रावण = उमंग श्रावण = तरंग श्रावण =बरसतो श्रावण = कोसळतो श्रावण = आनंद बहर श्रावण = सुंदर सर .,.........©®सुरजकुमारी श्रावण
Aishwarya Pradhane
श्रावणातील कानगोष्ट काल वसुंधरा गगनास बघ भेटली... अश्रूरुपी दवबिंदू पाहून खात्री सहज पटली... स्पर्शाने शहारुन सुंदर ती लाजली घरंगळले घुंगरू जशी नृत्यांगना थिरकली... अशी एक कानगोष्ट मला श्रावणात कळली. ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने. सोलापूर श्रावण
खुशी वायकर
✍️श्रावण बहरूनी आला......🌧️ 🌲🌳🌱🌴🌱🌿☘️🍀🌷🌺🌸 रानावनात पसरले पाचूचे पायदान चातक चोची टिपताय वर्षाऋतूचे दान आला बहरून मनमोही ऋतुराज श्रावण बनविण्या धरतीला लावण्यवती सौंदर्यवान. शब्दवर्षा वर्षा प्रकाश वायकर संगमनेर, अहमदनगर #श्रावण
Atal Ram Chaturvedi
श्रावण मासा मेघ दें, रुक-रुक तेज फुहार। "अटल" मास सिव कौ हतै, चपला करती वार। ©Atal Ram Chaturvedi श्रावण
Durga Deshmukh
🌧️🌧️🌧️ ग्रीष्मातल्या वेदनेवर फुंकर आला घालवत माझाच श्रावण कठीण खडतर भेगामधुनी बहरत आला माझाच श्रावण काटे तुडवित वाटेवरचे फिरवित होते नशीब मला फुलापानांच्या पायघड्या आला खुलवत माझाच श्रावण मनामनात भरली तुझी न् माझी प्रेमकहानी कागदावरती सांडुन रंगआला रंगवत माझाच श्रावण ह्दयामध्ये श्वास कोंदले इतक्या होत्या विरह व्यथा नजरेमध्ये चेहरा दिसता आला हसवत माझाच श्रावण आनंदात दुष्काळाच्या सोसवेना मला झळा कंठ कोरडा कोरडा श्वास आला भिजवत माझाच श्रावण अभिमानाच्या ताठ शिरेने जमळा मेळा गंगामाई न्हाऊन जाताना आला झुकवत माझाच श्रावण दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh माझाच श्रावण