Nojoto: Largest Storytelling Platform

New अशी ही भाऊबीज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशी ही भाऊबीज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशी ही भाऊबीज.

Related Stories

    LatestPopularVideo

DRx. Shital Gujar✍️

नाते जसे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर जसे |
रखरखत्या उन्हात मायेची सावली जसे ||
एक अतूट बंधन मायेने भरलेले|
पवित्रतेने सजलेली, आपुलकीने सजलेले ||

नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते  |
भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते ||
रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||

भावा बहिणीचे अनोखे नाते |
कधी हसून ,तर कधी रडवून  अतूट बंधन||
औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते |
माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध ||

संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल|
आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले ||
प्रेमाचा आणि मायेचा  भाऊबीज हा सण|
चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण ||

रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||
भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो|
मनी असलेले स्वप्न साकार होत राहो||
-✍️ काव्यशितल✍️
🤩 भाऊबीजचा खूप खूप शुभेच्छा भाऊ🤩

 #भाऊबीज

Sachin Zanje

अशी ही प्रेमकथा..

read more
एक थोडीसी कथा..

बरेच दिवसांनी ती बोलली.
बोलली ती म्हणून त्यांन सर्व व्यथा व्यक्त केली.
..
तो होता कवी ..
आणि ती होती मुलगी नवी.
..
भावनिक तेचा अर्थच होता त्याचा नेक
सौंदर्य तिचं रेखकटल त्यांन सुरेख.
..
कळले नाही तिचेच सौंदर्य तिला.
आवडीने पाठवले जे वाटलं त्याला.
..
होऊन गेली ती परी..
न दिसलेल सौंदर्य तिला तिचं त्यान रेखाकटल हयानेच झाली  दुरी..
..
पहीलाच हा संवाद 
तिनं केलं त्याला ब्लाॅक..
..
मग थोडा त्यांन विचार केला.
फोनवरूनच त्यांचा,मग  तिचा नंबर डिलीट झाला..

अशी ही असते काहीशी व्यथा.
घडते अशी ही जीवनात प्रेमकथा..

           सचिन.... अशी ही प्रेमकथा..

Sachin Zanje

तु अशी ही #Love

read more
तु अशी ही ...

कितीवेळा पाहावं तुला
पाहतच रहावं असं वाटतं.
भरूनही मन माझं 
रिकामच झालेल ते दिसत..

ओढ तुझी सखे 
लागते मज अशी.
ओंजळभर पाणी पिऊन
न भागावी ताहान जशी.

नवीन सुयोर्दयाची 
पहाट होते नव चैतन्याची.
तशी तू भासतेस ,असतेस
माझ्या त्या कवी मनाची.

कवी - सचिन सदाशिव झंजे. तु अशी ही

#Love

Sanchita Kekane

भाऊबीजRakshabandhan

read more
एक नात आपुलकीचं, एक नात हक्काचं...
अनमोल असत नात, बहीण अन् भावाच...

ओरडताना बाबांचं रूप दिसत,
 प्रेम करताना आईची माया दिसते, 
भांडण झाले कितिजरी, 
त्यात बहीण भावाच्या प्रेमाची छाया दिसते...

बहीण भावाच नात म्हणजे, सुवासिक चंदन,
बाप्पा चरणी करुनी वंदन,
चला साजरी करूया रक्षाबंधन...

                                     -Sanchita Kekane भाऊबीज#Rakshabandhan

Ganesh Shewale

भाऊबीज #sitarmusic

read more

Mohit Jain

अशी ही वेळ आली . . Life #Quotes

read more
अशी ही वेळ आली . .

आख्खे एक तप गेले , एका गोष्टीच्या पाठीमागे 
आता मात्र प्राधान्यक्रम बदलण्याची वेळ आली . .
पुढाकार घेत गेल्यावर हाती काय लागले ठाऊक आहे 
आता मात्र स्वतः ला बदलण्याची वेळ आली . .

स्वतः बद्दलचा जो गैरसमज आहे सर्वांच्या मनात 
त्याला झुगारून , सिद्धता सिद्ध करण्याची वेळ आली . .
हे तुला जमणार नाही ऐकले आता पर्यंत , कान देऊन 
आता मात्र ठामपणे करून दाखवण्याची वेळ आली . .

हिशोब ठेवला नाही आता पर्यंत , भावनिक गुंतवणुकीचा 
आता मात्र वेळ , पैसा , ऊर्जा कुठे गुंतवायची हे शिकण्याची वेळ आहे . .
सहजा सहजी होतो उपलब्ध , म्हणून मोल नाही उपस्थितीत 
आता विभक्त होऊन , कोण कुठे किती आठवतंय हे बघण्याची वेळ आली . .

नावासाठी असतील हजारो लोक सोशल मीडिया वर तुमच्यासाठी 
हाक मारल्यावर कोण धावणार खरा , हे पारखण्याची वेळ आली . .
जीव प्रत्येकाला लावू शकणार नाही तुम्ही , या कलयुगात हे ध्यानात ठेवा 
जी तुम्हाला उणीवा सहित स्वीकारेल , अशी व्यक्ती शोधण्याची वेळ आली . .


चार गोष्टी कमी जास्त असतील तुझ्या माझ्यात , हे स्वाभाविक 
या सर्व गोष्टींना मनापासून स्वीकारण्याची वेळ आली . .
प्रगल्भ होऊन , आर्थिकदृष्टीने , सकारात्मकतेने , उत्साहवर्धक 
शांतीप्रिय , स्वप्नवत आयुष्य साकारण्याची वेळ आली . .

©Mohit Jain अशी ही वेळ आली . .

#Life

Bhumika Milind Kamble

*अशी ही शांतता...❤️🍂 #शांतता #poem

read more
*अशी ही शांतता*...❤️

तू मला खूप आवडतेस...
माझ्या मनातली गाणी फक्त तूच गातेस...
तू मला ऐकून घेतेस , मला समजून घेतेस , माझ्या त्या गोड आठवणी फक्त तूच जपतेस...

रोज मला भेटायला येतेस...
कायम माझ्या सोबत असतेस...
माझ्या मनातले बोल ओठांवर आणतेस...
तू मला खूप आवडतेस...

आयुष्य माझे आनंदी होते , जेव्हा तू माझ्या सोबत असतेस...
डोळे मिटून फक्त तुझाच विचार केल्यावर...माझे मन तू तृप्त करतेस...

तू मला खूप आवडतेस...
 कारण तू शांत आहेस...💞

                                                - भुमिका मिलिंद *अशी ही शांतता...❤️🍂

#शांतता

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

कविता:-अशी ही मजबुरी #tereliye #VivekKanhekarWrites #nojotomarathi #nojotoenglish #poem

read more

Anil Awathere

'अशी ती'

read more

Vijaykumar Khune

🏮 *भाऊबीज..*🏮 🪔 VIJUDADA 🪔 Diwali

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile