Find the Latest Status about नात्यातील दुरावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यातील दुरावा.
pournima sadavarte
"दुरावा हा असा कसा.... आणी तुझ्या माझ्यात हा आलाच कसा?? नाती घट्ट असतात, ती फक्त जपावी लागतात.....।। अपूर्ण राहते ते नाते... कधी जोडली स्वार्थासाठी... आणी ते बंधन नसते कधी..।। आठवणींच्या ओंजळीत हरवून जायचं... मागचे सगळे विसरून पुढे चालायचे... न बोललेले शब्द भयानक असते... ज्याला समजेल त्याच्या हृदयाला भिडणारे असते....।। दुरावा--असाच असतो हे नशीब नाती जोडण्याची पुन्हा ठरवतो... नको असलेल्या त्रासातून स्वतः ला मुक्त करायचे..... बांधलेल्या बेडयांना स्वतः तोडायचे असते....।। खरचं ,दुरावा खरच गरजेचा असतो... तो पुन्हा एक मेकांना जवळ आणतो... पुन्हा नाते जोडतो.... आणि पुन्हा नात्यात विश्वास जपतो.....।।" ©pournima sadavarte #"नात्यातील दुरावा " कविता #allalone
ChetaN Gangurde
खूप लांब जावं लागतं, हे समजून घेण्यासाठी की, कोण आपल्या जवळ आहे... #दुरावा
Sampat Kaudare
हातामध्ये हात असताना सारं काही मस्त होतं.. हात सुटला साथ सुटली आता अस्ताव्यस्त आहे.. दुरावा
गोरक्ष अशोक उंबरकर
आठवणींना आठवलं नाही असा क्षण मला आठवत नाही.. आठवलेलं सगळंच काही डोळ्यात मात्र साठवत नाही.. सांगायच बरच असतं सांगावं कसं कळत नाही.. कळवलेलं कळूनही तुला तुझ्या सोयीने ते वळत नाही.. आठवणींचा येऊनही पुर नयनातूनी आसवे गळत नाही.. दूर राहुनी दुराव्याचे गणित काही जुळत नाही.. ©गोरक्ष अशोक उंबरकर दुरावा
गोरक्ष अशोक उंबरकर
कसं आयुष्य जगायचं ज्याचं त्यानं ठरवायचं.. जगलेल्या आठवणींना फुलासारख सजवायचं. हसायचं की रुसायचं आपलं आपण ठरवायचं .. इतरांच्या आयुष्यात कधी नाही पडायचं.. स्वतःच स्वतःला शहाणपण शिकवायच.. दुसऱ्यांच्या आयुष्यातून जरा लांबच राहायचं.. तुम्हाला काय करायचं अस सहज कोणी बोलायचं .. तोडून कोणी बोललं तर आपण ही बोलायचं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर दुरावा
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. पावसाच्या सरीसवे आसव हि ढळली तुझ्या'माझ्यातला दुरावा, निशब्द बोलली -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. दुरावा
RJ Prasad...
तुला पाहता आजही.. मनी दाटून येतो , प्रेमाचा गोड ओलावा... का बरं मग आजही.. पहावयास मिळतो , तुझ्या माझ्यात दुरावा... @ RJ Prasad... दुरावा
somnath gawade
हा दुरावा आता सहवेना तुझे भाव ही कळेना व्याकुळ तुझ्यासाठी दुसरे काहीच सुचेना #दुरावा
nitin bille
आपण भेटलो त्या दिवशी (तसं योगायोगानेच) तेव्हाच मी जाणलं होतं. उरलं नाही काहीच आता, तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं. माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं) आता आटलं होतं. तू निघून गेलीस पुढे कसे आहात विचारून, तुला पाठमोरी पाहताना माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢 नितीन.....✍️ दुरावा.... #Sandland
vaishali
तू ही दूर मी ही दूर तू ही मजबूर मी ही मजबूर दूर दूर असूनही जुळला आपल्या प्रेमाचा रे सूर खूप काही साठले आहे मनात जे बोलायचे आहे तुझ्याशी तू ही तुझ्या मनातील हितगुज कधी करशील का रे माझ्याशी मिलना पेक्षा विरहाचे दुःखच जास्त आपल्या प्रेमात खऱ्या प्रेमाची कसोटी नेहमीच द्यावी लागते नशिबात आयुष्यभर दूरच रहावे लागणार का ? हा प्रश्न आज पडला समाज कधीच मान्य करणार नाही का रे आपल्या प्रेमाला तूच माझा श्वास आहेस मग तुझ्याशिवाय जगणे जमेल का रे मला तुझ्यातच आहे जीव माझा सांग जपशील का रे स्वतःला #दुरावा #yqtaai#yqdidi#