Find the Latest Status about भावनांचा गोठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनांचा गोठ.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
Agricoss Akash Babaso Chavan
शब्दांना भावना नसतात आणि भावनांना शब्द नसतात , की भावना असूनही भावना शून्य राहून भावनेचा भाव मनात दाबून ठेवण्यासाठी शब्दांची ताकद खर्ची पडते, म्हणून मग भावना या शब्दांची ताकद होण्याऐवजी त्या गुलाम होतात शब्दांच्या आणि त्यांच्या व्यक्त होण्यासाठी नेहमीच शब्दांची गरज पडते. पण शब्दांच्या पलीकडे जाऊन ज्या भावनेला अस्तिवाच वरदान लाभल असेल तीच भावना मूर्त रुपात येते आणि शब्द सुद्धा तेच बोलतात जे भावना सांगते बऱ्याचदा शब्दांच्या भावनाच वेगळ्या असतात भावनेचा आहारी जाऊन....... ...आनंद भावनांचा भाव...
vaishali
🌷 भावनांचा खेळ 🌷 माझे माझे इथे नसते कोणाचेच काही माणूस एकटाच येतो अन् एकटाच निरोप घेई माझी माणसे माझी नाती हा सारा भावनांचा खेळ कोणालाच नसतो इथे कोणासाठी वेळ जो तो इथे फक्त स्वार्थ स्वतःचा साधतो संपत्तीच्या हिस्स्यासाठी भाऊ भावालाच मारतो सुखात सारे सोबती दुःखात नसते कोणी जीवाला जीव देणे ही प्रथा झाली जुनी जिवंत असता कोण कोणास पाजत नाहीत पाणी मेल्यावर मात्र रडत रडत गातात गाऱ्हाणी जिवंतपणी कोण कोणास कुठे चांगले म्हणतात स्तुती मात्र सरणावर जळतानाच करतात भावनांचा खेळ #मराठी कविता#
प्रकाश साळवी
भावनांचा का उगा आधार घेतो ! भावनांचा का उगा आधार घेतो तुझ्या पुढे उगा का माघार घेतो ** जन्म शोधावया माझाच मी उगाच का मी असा कट्यार घेतो ** नको देवूस दाखले चांदण्यांचे नकार देऊनी मी आकार घेतो ** सुखासाठीच धडपडतो रात्रंदीन कोठार सुखाचे देऊन मी प्रहार घेतो ** फुलतील बघ दाही दिशा पुन्हां गायनाला साथ दे मी सतार घेतो ** प्रकाश साळवी १०/०५/२०२० भावनांचा का उगा आधार घेतो !
Shubhangi Sutar
गुंता हा भावनांचा ठाव घेता मनाचा कस सोडवू हे प्रेमाच कोड का असच राहू दे हे कोड त्याला बघताच न राहिले भान या भावनांना गुंतत गेले त्याच्यात सोडवता आला नाही हा गुंता म्हणुनी आयुष्यभरासाठीच त्याच्या सोबतच गुंतून गेले सात जन्माचा हा गुंता ठाव घेत मनाचा एका जन्मात कशी सुटेल जन्मोजन्मीची ही साथ गुंतले होते त्याच्या श्वासात गुंतले होते त्याच्या सहवासात गुंतले होते हात त्याच्या हातात गुंतले होते डोळे हे त्याच्या नजरेत अन गुंतले होते हे हृदय त्याच्या हृदयात ©Shubhangi Sutar गुंता हा भावनांचा...ठाव घेता मनाचा
Suresh Singh
घास पन भयन होकि गोठ गाइ की यती झल्को के लाग्दो हो घरका साइकी
yogesh atmaram ambawale
दोन दिवस झाले ताई कडून विषय नाही आला म्हणून आपले मानून भावनांचा उद्रेक होणार होता, घेतले पेन आणि भावनांचा उद्रेक कागदावर उतरवणार इतक्यात, बरे झाले ताई कडून विषय आला, आणि भावनांचा उद्रेक होता होता राहिला. नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
Aloneboy
#OpenPoetry यादों के बुरादे झोंक कर वक़्त की अंगीठी पर रात फूँक दी हमने और सुबह तक जलती रही ख्वाहिशे, लपटों में चुप्पी साधे थी एहसास की तपिश जो तुम्हारे साथ ही चली गयी और मेरे पास रह गया था बस सर्द सन्नाटा… ✍️नवीन #Goodmorning#Memories Meena भावनांचा कैदी👍 Տℍᗅℍⅈⅅ ᗅℍℳℰⅅ jay sharma DANISH KHAN aamil Qureshi
꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂
#queenofdiamondeyes Chandan - The entertainer Jha भावनांचा कैदी👍 Tausif Khan Sudhanshu Ojha My_Words✍✍