Find the Latest Status about भरलेलं आभाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरलेलं आभाळ.
तानाजी ताकमोगे
।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं रान ओलांचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।। ।। दुःखाच्या डोहावरील आधाराचा सेतू।। ।। निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू।। ।।कधी मन धरणारी , तर कधी कान धरणारी.।। ।।कधी हक्काने रागवणारी, तर कधी लाडाने जवळ घेणारी.।। ।।बहिणीचा रुसवा जणु, खेळ उन-सावलीचा.।। ।।भरलेले डोळे पुसाया आधार माय- माऊलीचा.।। ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे.।। ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे.।। ।।भरलेलं आभाळ रितं कराया तिचीच ओंजळ पुढे येई .।। ।।जागा जननीची भरुन काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।। आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं
कुलदीप दुर्गे धसवाडीकर
अख्ख आभाळ कवेत घ्यायच होत मला.. पण तुकड्यातुकड्याने हाती चतकोर आल... आभाळ
Kailas Tidke
ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं.. अन दुसऱ्याच ओरबाडून घ्यावं इतकं अंगात बळ नव्हतं... ®कैलास #आभाळ
Kailas Tidke
ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं.. अन दुसऱ्याच ओरबडण्याइतक माझं मन गढूळ नव्हतं... ®कैलास #आभाळ
मैत्रेय
#आनंदयात्री रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाहिलं आणि सहजच गुणगुणलो "आज मैं उपर आसमा नीचे" हा माझा बालपणीचा पावसाळ्यातील छंद, आभाळाला कवेत घेताना स्वर्गीय आनंद व्हायचा, सूर मारुन आकाशाला गवसणी घालाविशी वाटायची. बालपण सरलं आणि पायाखालचं आभाळच फाटलं. वाढत्या जाणिवांनी जमिनीशी नातं सांगताना आकाशाशी जडलेली नाळ कापून टाकली आणि माझं आभाळ पारखं झालं मला.आता जमिनीवरची लढाई लढत माझं आभाळ शोधतोय. सारं काही आनंदासाठी.... मैत्रेय(अंबादास) #आभाळ