Find the Latest Status about मायेचा सागर कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मायेचा सागर कीर्तन.
vaishnavi atkare
दिवस कसे हे सरून गेले कळत मला नाही पण माय माझी तिळभर सुद्धा आटली नाही कितीक झाले त्याग तिचे मोजणी त्याची नाही मला वाटते त्यागाला तिच्या जगात उपमा नाही वैष्णवी अतकरे आई मायेचा सागर###
Chaitali Yengade
नभांगन:- तुझ्या गर्भात वाढुनी अनुभवले नभांगन सहवासात तुझ्या ग आई फुलले हे गगन...!!१!! हात डोक्यावर फिरुवूनी मायेचा हृदयावर सोडली प्रेमाची छाव कुशीत तुझ्या असताना भासे चंद्र तारकांचे गाव...!!२!! नभिचा चंद्रही रुसला असेल जेव्हा तू मला घास भरवला आईच्या प्रेमाचा सागर पाहता गगनी चंद्रही रडला...!!३!! मायेचा पदर तुझा रवीला ही आवडला असेल तेज, उष्णता सोडून रवीला ही आईच्या कुशीत यावं वाटलं असेल... रवीला ही आईच्या कुशीत यावं वाटलं असेल...!!४!! ✍️ कु. चैताली येंगडे #आईचेप्रेम#मायेचा सागर#परमेश्वराचे रूप# दैवत#
राजेंद्रभोसले
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या...... पोपटपंची अध्यात्म रुजू लागले तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची संख्या वाढली या राजवटीत अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी काढणारे , दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार यांनी कहरच केला डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे , व्यावसायिक ही अनुभवले परदेशातील भावनिक गोष्ठी सांगून लोकांना शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें, नाटकी कलाकार ही पाहिले विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले टीव्ही वर तर जाहिराती पहिल्या माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग