Find the Latest Status about सासरला हि बहिण निघाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सासरला हि बहिण निघाली.
Mansika Bhoir
कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीच नात गोड आहे🥰😍💯 ©Mansika Bhoir भाऊ बहिण
umesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली
Vilas Bhoir
सुख दुःखाच्या वाटेतील दुःखद क्षण वेचून ती... घेते लहान असो किंवा मोठी भावासाठी पाठराखीण बनते सासर माहेरच्या नात्यांना प्रेमाच्या धाग्यात ती... विणते कधी मायेचा झरा तर कधी सरिता बनून वाहते तिने दादा म्हणताच ताई म्हंटलं की ती... सुखावते आपल्या लाडक्या भावाला वेळप्रसंगी प्रेमाने सावरते मोकळ्या मनाने बोलण्यासाठी कधी कधी मैत्रीण ती... बनते रागवलीच कधी भावंडांवर तर समजूतदारपणे समजूनही घेते नारळी पौर्णिमेच्या सणाला माहेरी येऊन औक्षण ती... करते भावाचं रक्षण व्हावं म्हणून हातात प्रेमाचा धागा बांधते आनंदाच्या प्रत्येक घडीला मायेचा घास ती... भरवते चुकलंच कधी काही तर मोठ्या मनाने माफ करते धन दौलत काही नको मज देवापाशी मागणं ती... मागते असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी आम्हा बहीण भावाचे नाते ~ विलास भोईर (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते
SHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
Pooja Bagal
जगात कोणत्या नात्यात जेवढी ओढ नाही, तेवढी ओढ भाऊ-बहिणीच्या नात्यात आहे. म्हणून तर भाऊ-बहिणीचं नात सगळ्यात गोड आहे. ©Pooja Bagal #rakshabandhan #Brother #sister #भाऊ #बहिण
Rakesh Kumar
हर पल को जी लेता हूं खुशी हो गम जीवन के रंग को शी लेता हूं ©Rakesh Kumar हि