Nojoto: Largest Storytelling Platform

New सोबती मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोबती मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोबती मराठी चित्रपट.

Related Stories

    LatestPopularVideo

Dileep Bhope

झेलून झळा उन्हाच्या 
कसा फुलतो मोगरा, कन्हेर
अडचणी असतील लाख
निसर्ग सोबती असतो दिलेर

©Dileep Bhope #सोबती

Dileep Bhope

शब्दवेडा किशोर

सोबत.. 
शब्दवेडा किशोर 
होते सोबतीला पाच जण 
परत फिरले चार जण 
नव्हते बोलत कोणीच 
मुकी झाली होती
सगळ्यांची शब्दसरीता 
स्मशानातही भरली स्मशान शांतता 
जळताना ओढकेही रडत होते 
जगणंच एक जळणं होतं हे 
सगळ्यांना शिकवत होते 
अर्थ नाही उरला या देहाला 
प्राण कधीच सोडून गेला 
अर्थ नाही प्राणवायुला 
जेव्हा त्याचा खरा अर्थ उमगला 
म्हणे सोबतीला अर्थ होते  
देहाच्या तिजोरीत मात्र रितेपणाच्या 
खडखडाटाचे फटाके वाजत होते

©शब्दवेडा किशोर #सोबती

Manish Kanade

शब्द का सुचतील आता 
तू न असता सोबती.. 
वादळे उठतील आता 
प्रश्न आता सोबती 

मी मनाला सावरावे 
तू स्वतःला आवरावे 
भेटता न बोलती का ? ते 
प्रश्न आता सोबती... 

मी तुला सोडुनी जाता 
न बोलता तू चालली 
भावनांच्या वादळाचे 
प्रश्न आता सोबती 

सर्वकाही आहे आज 
ओढ ती ना लागते 
उत्तरांच्या वादळाचे 
प्रश्न आता सोबती 
          - मनिष ज्ञानदेव कानडे #सोबती

Manish Kanade

कवी - के. गणेश

सोबती....

read more
दुःख पचवायलाही सोबती असावा
गोड लागतो भाकरीचा घास..
फक्त हात सुटू नये आधाराचा
मग मजेत होतो प्रवास..! सोबती....

Purva Deshmukh

Vilas Bhoir

सखी.... सोबती.... !

read more
मनातले सारे सांगण्याजोगं
कुणीही नव्हतं सोबतीला 
तेव्हा आयुष्याच्या वळणावर
तु.... नव्याने भेटली मला

भेटणे तुझे हे पुन्हा पुन्हा 
मला आठवणींत भिजवते
अतुट बंधनात जोडलेले  
तुझे नि माझे मैत्रीचे नाते

मैत्रीतील अनमोल क्षणांनी 
नाते विणले जन्मांतरीचे
पाहुन तुलाही सापडले ते
हरवलेले दिवस रोजचे

दिवसांत शिंपीत चांदणे 
रोजचे गाणे ओठांवरती
हातात तुझ्या हात देऊनी 
झाहलो सखी तुझा सोबती

तुझ्या निरव शांततेचा 
सोबती होऊन साथ देईन
असेच राहु दे नाते आपुले
सखी... सोबती... होऊन

                              ~ विलास भोईर
                              ( सखी.... सोबती.... ) सखी.... सोबती.... !

Shahaji Chandanshive

सोबती #SunSet

read more
सोबती
सोडताना गाव हा का असा थांबलो
ना कळे कोणत्या रेशमा नी बांधलो..
फाटलेला असा इथे आलो मी एकदा
परतुनी चालताना पुरता मी  सांधलो..
प्रवासी मी परतीचा थांबलो होतो इथे
संपला मुक्काम तरी कैफात ना झिंगलो
सोबतीस होती माझ्या दुःख आणिवेदना
चांदण्यांची फुले इथे वेचूनिया चाललो..
जिंदगीचा ना  कुणी  इथे माझा सोबती
भेटली ती सर्व नाती सोडुनीया चाललो..
            -------

 कवी - शहाजीकुमार चंदनशिवे,  
अकोला ता.सांगोला जि.सोलापूर

©Shahaji Chandanshive सोबती 

#SunSet

Titkare Pratiksha Sadashiv

#तु सोबती नसताना

read more
तो स्पर्श हळव्या ओळींचा,
तु सोबती नसताना...
मनाच्या त्या पर्णावर 
अंसख्य कविता रेखाटल्या
तुलाच नीजदिन स्मरताना...
अन् दुरुनच जरी मी 
तुला पाहताना...
तरी रोज नव्याने बहर येई
माझ्या या शब्दसुमनांना
     लेऊनी हा गंध बघ तुझ्याच प्रितीचा...
तो स्पर्श हळव्या ओळींचा,
तु सोबती नसतानाचा...

                                                -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #तु सोबती नसताना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile