Find the Latest Status about असं गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असं गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Santosh Hadapad
असावं असं कुणीतरी आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं.. इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं.. मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं.. कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार... आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं.. मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं... आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं, दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं... खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी
कवी - के. गणेश
आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं वय कसं निघून जातं.. जगून घेईन म्हणत म्हणत आयुष्य किनाऱ्याला येतं.. चुरगाळलेल्या फुलासारख्या भावना विरून जातात.. मागे वळून पाहताना डोळेही भरून येतात.. ऋतुपरत्वे झाडाची पानं गळू लागतात.. ऊन वाऱ्याच्या झळा आपसूक कळू लागतात.. भूतकाळाकडं बोट करून रडताही येत नाही.. अन् चुकलेलं गणित खोडताही येत नाही.. पार शेवटच्या वळणावर जाणीव खोल होते.. जणू ओस माळरानात बहरायची सल राहते.. @kganesh ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..