Nojoto: Largest Storytelling Platform

New 'आयुष्य' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'आयुष्य' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'आयुष्य'.

शब्दवेडा किशोर

White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही मजला काहीच 
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल 
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल  ||१|| 
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की 
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल   ||२||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White  सावरले घरटे मी....
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत
मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत
सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत
जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला
अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले
रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला 
मजपासुनच दूर तकर राहिले
सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी 
मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले 
मीच नाती जपून ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले
मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले
मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य
क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

माझं नशीब इतकं खराब झालंय की
जर मी एखादी स्मशानभूमी जरी
राखायला घेतली
तर माणसं मरायचीसुद्धा
बंद होतील..
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

गोरक्ष अशोक उंबरकर

आयुष्य

read more
White कळत नकळत प्रत्येकजण 
एक आयुष्य जगत असतं..
मनात एक जगात एक 
स्वप्न सजवत बसतं..

सजलेल्या स्वप्नांच्या 
कोणी मागे पळत असतं..
पळताना सगळं काही 
मृगजळागत भासतं..

कष्टाच्या जोडीसोबत 
नशीब जेव्हा जुळतं..
आयुष्याच्या वळणावर 
तेव्हा सगळं काही मिळतं..

तेव्हा सगळं काही मिळतं..

©गोरक्ष अशोक उंबरकर आयुष्य

शब्दवेडा किशोर

White दोन लाकडं ठेऊन जा..
शब्दवेडा किशोर
मी सरणावर असतानाही
त्या मेलेल्या हळव्या मनास माझ्या
जरासा धीर देऊन जा
कुणी काही म्हणो
एकदा माझ्याकडे येऊन जा
वाटेल तुलाही खूप अवघड
मला असं अचानक
निश्चल पडलेलं पाहुन गं 
सखे शेवटची एक इच्छा
आहे मनी माझ्या
रचलेल्या माझ्या त्या सरणावर
दोन लाकडं ठेवून जा

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #याला जीवन ऐसे नाव....
शब्दवेडा किशोर
चाळीस किलो लाकडाच्या सरणावर
फक्त अडीच तास जळण्यासाठी
माणूस आयुष्यभर जळत असतो....
कधी स्वतःच्या स्वप्नासाठी....
कधी नातेवाईकांसाठी....
कधी भावनांसाठी....
तर
कधी अंगावर पडलेल्या
जबाबदाऱ्यांसाठी....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White अभ्यासाचा शेवट..
शब्दवेडा किशोर 
शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित होतो
Answers लिहिताना party चं planning करत होतो
Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं सांगितलं 
अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं    ||१||
घड्याळाचे काटे उलटे फिरले College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले
कसे हे दिवस भराभर निघून गेले काहीच नाही कधी कळलं
सगळं नकळत घडलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||२||
उद्यापासून Lectures व attendance ची कटकट नसणार होती
पण lectures bunk करून picture बघण्याची मजाही काही औरच होती
त्या दिवशी मात्र १००% attendance पाहून सरांना सुद्धा नवल वाटलं
आता सगळं संपलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं  ||३||
मित्रांसोबत केलेली मजा व त्या तासंतास केलेल्या गप्पा आठवतात party ची केलेली plannings
आणि bike वरच्या ट्रिप्स आठवतात आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगवेगळं 
यार....आपलं College Life संपलं..उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे
अन् Office मध्ये जाऊन सगळेच काम करणार आहेत
Casual जीवन संपून आता Formal जीवन सुरु झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं                ||४||
उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं लागणार खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च
करावा लागणार महिन्याच्या पगाराचं Saving आता सुरु झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं                      ||५||
आता ते presentations आणि assignments नसणार
ग्रुप प्रोजेक्टच्या नावाखाली केलेली भटकंती नसणार Important Notes चं 
गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं miss u my lovely XEROX Machine..हेच आता नशिबी आलं..
अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं           ||६||
बघता बघता दिवस निघून गेले...
काहीच नाही कळलं गेल्या महिन्यातच Admission झालं जणू
असंच मला तेव्हा वाटलं
चांगलं वाईट असं सगळं काही मी अनुभवलं
का लवकर मोठे झालो आणि आता
जबाबदारी हाताळायचं ते जिणं नशिबी आलं..
अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं ||७||
जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार होती
नव्या कोऱ्या पाटीवर आता कर्तबगारी कोरायची होती
यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं
अन् जे नको होतं तेचं झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं    ||८||
या सगळ्या विचारांनी डोळ्यात आपसूक पाणी आलं
पेपर उडून गेला आणि हातातलं पेनही गळून पडलं
वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं
थोडा Extra Time मिळेल का ??
कारण
नियतीने एक अघटीत घडवलं..अन् मला कळलं..अरे आपलं
College Life तर आता संपलं                ||९||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White दोन लाकडं ठेऊन जा..
शब्दवेडा किशोर
मी सरणावर असतानाही त्या मेलेल्या मनास हळव्या
जरासा धीर देऊन जा
कुणी काही म्हणो एकदा माझ्याकडे येऊन जा
वाटेल तुलाही अवघड मला अचानक पाहुन गं 
सखे शेवटची एक इच्छा आहे मनी माझ्या
रचलेल्या माझ्या त्या सरणावर दोन लाकडं ठेवून जा

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White मी एक शापित जोकर..नाव माझे शब्दवेडा किशोर
शब्दवेडा किशोर 
मी एक शापित जोकर..नाव माझे शब्दवेडा किशोर
भावनांची विक्री करायला मज जमलं असतं तर
मीही पैशाच्या जगात स्वतःला खेळवलं असतं 
असे छक्के पंजे नाही जमलं म्हणून तर
शापित जीणं उराशी निखाऱ्यागत धरून जगतोच आहे मी
त्या निखाऱ्याला जर बाजूला फेकलं असतं
अन् जन्माने मिळालेल्या स्वभावाच्या विरुद्ध
स्वतःला वळवलं असतं तर
केव्हाच श्रीमंताच्या लिस्टला माझं सुद्धा
नाव लिहिलं गेलेलं असतं

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile