Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्य_जगताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्य_जगताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआयुष्याने एक गोष्ट शिकवली, मरठ स्टेटस आयुष्य video, आयुष्यभर साथ देणारी, आयुष्यभर साथ देईन, आयुष्यभर साथ,

  • 7 Followers
  • 29 Stories

hemlata mandle

Shankar Kamble

*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले मज भाव कोवळे जपताना* ...

 *लवलेश ना लयाचा आरंभ अंत पार* 
 *हसऱ्यां फुलांसवे मी नितं स्वच्छंदी रमताना* ...

 *उकलली मनाच्या खोल तळाशी* *खूणगाठ बांधलेली* 
 *शहाण्यांच्या जगात वेडा मी एक हासताना* ...

 *सांज होता उडून गेले पंख पसरूनी* *क्षण निसटले* 
 *कशास गुंता उगा सोडवू शांत स्तब्ध मी खग बघताना* ...

 *जीवनरस हा नितं प्रवाहित खंड त्याला कदा नसे* 
 *सुखदुःखाचे गरळ पचवूनी प्रवाही स्वैर तो वाहताना...*

©Shankar Kamble #आयुष्य #जीवन #जीवनअनुभव #जगणे_येथे_महाग_झाले #जीवनगाणे #जीव #आयुष्य_जगताना 
#Drown

Shankar Kamble

@गझल @
        आयुष्य पेलतांना दुःखास झेलताना
        वणव्यात गारवा तू शून्यास व्यापताना

        माझ्याच सावलीने साथ सोडली कितीदा
         झळ सोसली उन्हाची माझ्यात गुंतताना

       वाट्यास ना कधी आले दान सुगंधी फुलाचे
        स्मरते मला तशी तू काट्यास वेचताना

         ओसाड भग्न लेणी अवशेष हे लयाचे
          माळलेस  उन्मेष रंग हळुवार फुंकताना

           एकरूप देह गात्र अस्तित्व ना स्वतःचे
           वेदनेचे गीत केले लोकांस सांगताना

           जपले मला उरी तू शिंपल्यातला मोती
          कवडीमोल नगाचे भाव अमूल्य करताना

©Shankar Kamble #गजल #आयुष्य_जगताना #जीवनअनुभव #सत्य #प्रेम #प्रेमकवि #विरह #गझल 

#Saffron

Shankar kamble

*खळखळ होवून मुक्त झऱ्याची* 
 *आयुष्याचे गाणे गावे* 
 *रंग बेगडी खोडून सारे* 
 *आत्मरंगी रंगून जावे* 

 *पंख देवूनी मनःपाखरा* 
 *स्वच्छंदी गगनात फिरावे* 
 *गुरफटून कोशात स्वतःच्या* 
 *भार प्रौढी उगा वहावे* 

 *आव्हानांना भिडवीत डोळे* 
 *तुफानांना तुडवीत जावे* 
 *निधड्या छातीवरती झेलीत* 
 *संकटावरी कोरीत नावे* 

 *विखुरलेल्या स्वप्नांचे* 
 *मोती-मोती वेचीत जावे* 
 *सर गुंफूनी स्वयें तयांचे* 
 *भार कंठी मिरवीत गावे* 

 *कशास चिंता व्यर्थ उद्याची* 
 *मृगजळी का उगा फसावे* 
 *रीती ओंजळी क्षण निसटती* 
 *शल्य शेवटी काय असावे?* 

 *ताल-सूर जरी आज हरवले* 
 *गीतं तरी ते मनीं ठसावे* 
 *आळवून त्या रंम्य लकेरी* 
 *कैक मैफीली सूर सजावे*

©Shankar kamble #आयुष्य #जगणे #जीवन #आयुष्य_जगताना 

#Thoughts

sandy

#आयुष्य_जगताना.....? स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत. (कडू असो की गोड) एक स्वप्न पूर्ण झाल की, दुसर्‍या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य?, आयु÷ष्य हे न उलगडणारं कोडं आहे. आपण कितीही स्वप्न पाहिले तरी ते पूर्ण होतीलच असे नाही. ते पूर्ण झाले नाहीत म्हणून जगणं सोडायच का? या प्रश्‍नाचे उत्तर नाही, असेच येणे अपेक्षित असते. तसे लोकांच मन राखण्यासाठी आपण स्वप्ना

read more
 #आयुष्य_जगताना.....?

  स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत. (कडू असो की गोड) एक स्वप्न पूर्ण झाल की, दुसर्‍या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य?, आयु÷ष्य हे न उलगडणारं कोडं आहे. आपण कितीही स्वप्न पाहिले तरी ते पूर्ण होतीलच असे नाही. ते पूर्ण झाले नाहीत म्हणून जगणं सोडायच का? या प्रश्‍नाचे उत्तर नाही, असेच येणे अपेक्षित असते. तसे लोकांच मन राखण्यासाठी आपण स्वप्ना

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile