Find the Latest Status about हलविते तुझा पाळणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हलविते तुझा पाळणा.
Ganesh Shinde
गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला, काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।। नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा, म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।। देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला, उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।। मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले, गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।। पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला, मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।। सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले, आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।। अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला, कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns
Shilpa Suryavansi
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू प्राजक्ता चा सडा क्षणभर का होईना मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास
शुभम दि. कांबळे
तुझ्या जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या, पण त्यातूनही वाट काढत, धडपडत स्वतःला सावरत, तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना, गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण, अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी, नाही... फरक एवढाच असेल की तुझी जागा, घेणारी दुसरी कोणी तरी असेल.. - शुभम दिपक कांबळे #विरह तुझा