Find the Best तुझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutयेईल दिवस तुझा ही माणसा, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा lyrics, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा lyrics, तुझा ना भरोसा, तुझा चेहरा मराठी कविता,
Dharmendra Gopatwar
📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
Sujata Chavan
तुझा अलवार स्पर्श प्रीत मनी फुलवून गेला डोळ्यात दाटल्या भावना श्वासात सामावून गेला तुझा अलवार स्पर्श अंग अंग मोहरून गेला शब्द तुझ्या नावाचे ओठांवर भिजवून गेला तुझा अलवार स्पर्श स्वप्नमनी दाखवून गेला त्यात मज गुंफून छान सजवून गेला तुझा अलवार स्पर्श दुख सारे विरवून गेला प्रेमरंगात तुझ्या ...सख्या मला सुखावून गेला तुझा अलवार स्पर्श पावसासम बरसून गेला चिंब होऊनी तन-मन तुझ्यातच सामावून गेला अंजु...!! ©Sujata Chavan #तुझा स्पर्श#
#तुझा स्पर्श#
read moreMohit Jain
#तुझा सहवास. . तुझ्या सहवासाची करतो मनोकामना तुला पाहण्याची मनात आहे ओढ . . कितीही येऊ देत तिखट तुरट अनुभव तुझी सोबत मिळेल तर वाटतील गोड. . ©Mohit Jain #Love
Love
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
ज्या कवितेने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विशेष दाद मिळवली, ज्या कवितेने आजवर अनेक कवी संमेलनामध्ये काव्य रसिकांचं विशेष प्रेम मिळवल, ज्या कवितेने मला साहित्यात विशेष ओळख निर्माण करून दिली ती माझी सर्वात सुंदर आणि आवडती कविता #तुझा #वेडा.... आज तिची दखल गुगल सर्च इंजिन ने घेतली...
read morePallavi Phadnis
कधी हात सुटून गेले कळलेच नाही,चालता चालता सावरत होतास उगाच कधी माझे भार उचलत होतास, माझ्या आयुष्यात तुझाच पहिला आणि शाश्वत स्पर्श एक प्रेमळ धाक आणि त्याच हातांची प्रेमाची भरली ओंजळ, ती ओंजळ कधी रिकामी झालीच नाही,जादूगाराने आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि स्वतःचे मन मारून ,आमचे मन भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा यायचास तेंव्हा किती घर भरून जायचे,तू जाताना मात्र मी वाहून जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा किती आनंद झाला होता,पण नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा समवेत घेऊन आला होतास तू जवळ असूनही ,दूर जाण्याची मनात एक कायम भीती आता डोळ्यांच्या पाण्यात धुरकटलेली विझणारी दिसत होती नाती तू माझा बाबा म्हणून आलास आणि स्वतः मात्र देव होवून गेलास तू जाताना किती गळा दाटला होता आता तुझा नी माझा ऋणानुबंध अलगद निसटला होता , तुझा शेवटचा हात माझ्या गालावर फिरला आणि तुला पाहतानाच मी हुंदका गिळला,आता तू फिरून येऊ नकोस ,सवय झालीय मला आता विनाधार जगण्याची फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू तुझ्या हातांचा आधार दे,जे काही कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय पल्लवी फडणीस,भोर✍
Shilpa ek Shaayaraa
केवडयाचा गंध तुझा, सावळा हा रंग गं.. प्रेमामध्ये सखे तुझ्या, झालो मी दंग गं.. स्वप्नाचा राणी माझ्या, करु नको भंग गं.. साता जन्मी लाभो मला, सखे तुझा संग गं.. घालतोय साकडे देवा, केले आहे तंग गं.. तुलाही लागावा सखे,, माझाच छंद गं.. #Shilpa #Kevda #KuchhTaarifeApniBhi #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
Pallavi Phadnis
तुला वाटते मी सोडून सगळे पाश, आणि सोडावा मी श्वास सगळेच बंध सुटून जातील आणि मग एकमेकातून मोकळे होतील मी तरी कुठे अडकायचे म्हणते,मी ही जिवंत असून रोजच मरते आता हा श्वास ,ही भास वाटतो उगाच खोल उसाशांनी गळा दाटतो उगाच देह जीर्ण करून ,मरणाची वाट बघत कशाला जगायचे,फुला सारखा देह ,सोडून निर्माल्य होवून वाहत्या पाण्यात वाहत जायचे माझी डोळ्यांची निरांजने ,रोज देवाला ओवाळतात त्यातील ज्योती हळूवार विझण्याची वाट पाहत असतात पण कधी तरी त्याचे,मला निरोप असतात,अजून तुझ्या कर्माच्या मी गाठी सोडवतोय ,आणि बळेच वेळेला मी अडवतोय , जेंव्हा सुटतील सगळ्या गाठी,तेंव्हा मी केवळ तुझा असेल आणि तुझा विरक्त आत्मा माझ्यासाठी पल्लवी फडणीस,भोर✍
Yogesh Hiwrale
"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी, आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी. पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी येत होतीस. मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच नेत होतीस. तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा. तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा. प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी मीच तुला दिसत असे. राग ही तुझा किती देखणा असायचा माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज तू दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे. सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र आस " एक आठवण रोजची
एक आठवण रोजची
read moreKishor Rokade
दोस्ती कसं सांगु मी तुला की तु.. माझ्यासाठी काय आहेस.. मी निर्लज्ज.. तु माझी लाज.. मी तुझा काल..तु माझा आज.. मी कालचे स्वप्न..तु आजचा साकार.. मी डगमगतं जीवन..तु त्याचा आधार.. वेगवेगळे असेल माझ्या जीवनातले प्रकार.. तुझ्यामुळेच मिळाला मित्रा या आयुष्याला आकार...! तुझा मित्र: श्री किशोर ज्ञा.रोकडे.अभीजीत i love you..! "शब्दरुपी पुष्प मैत्रीच्या नात्याला" देवाने दिली मुभा.. हे नातं तु स्वतः बनव जा..! स्वार्थाच्या या दुनियेत.. निस्वार्थ प्रेमात न्हाऊन जा..! KDR
"शब्दरुपी पुष्प मैत्रीच्या नात्याला" देवाने दिली मुभा.. हे नातं तु स्वतः बनव जा..! स्वार्थाच्या या दुनियेत.. निस्वार्थ प्रेमात न्हाऊन जा..! KDR
read moreJugal Madwal
(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत ) भांडण !!!! माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...
read more