Find the Latest Status about वल्गना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वल्गना.
Sangeeta Kalbhor
प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. पण तूला हे माहित नाही.. नाही डावलू शकत आपण आपल्या भाग्याला.. प्रेम म्हणजे त्याग असतो सर्वस्वाचा.. नुसत्या वल्गना करुन कायं उपयोग हिंमत असेल तर राहून दाखवावे.. प्रेमापासून अलिप्त.. अगदी हाकेच्या अंतरावर असूनही आलबेला ठेवावा लागतो.. मनातला गाभारा.. उजळून येण्यासाठी.. आणि करावी लागते सोबत अंधाराची.. उजेड स्वतःहून नाकारण्यासाठी.. साधी गोष्ट हायं होयं प्रेम करणं.. हातात दीवा घेऊन.. फक्त चालायचं.. स्मरत.. प्रेमाला... प्रेमासाठी..... ©Sangeeta Kalbhor प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त..
Sangeeta Kalbhor
मी जीवनगाणे गातो आहे.. खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे नको वल्गना थातूरमातूर मी मलाचं माझ्यात शमवतो आहे घालू नका साद आता कोणी मी स्वतःतचं स्वतःला शोधतो आहे कितीक राहून गेलेल्या क्षणांना क्षणभर थांबून मोजतो आहे कोण माझा मी कोणाचा प्रश्न ना मला छळतो आहे क्षणभंगूर हे जगणे इथले क्षणही मला क्षणात कळतो आहे नको लत्करे विचारु आयुष्या तूला कधी का मी टाळतो आहे? वरपांगी नाही रे माझे मिलन तुझ्यास्तव अख्खं काळीज जाळतो आहे म्हणो कोणी काहीही मला मी माझे सुख दुःखालाच म्हणतो आहे देणे व्हावे माझ्या करवी माणूसपण एवढेचं मी जाणतो आहे..... मी माझी..... 09/03/2023 ©Sangeeta Kalbhor #holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न