Find the Latest Status about शोधला का नाही अजून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधला का नाही अजून.
प्रकाश साळवी
अजून समजलेच नाही ...! वाचले संवाद हजारदा कृष्ण अर्जुनाचे मर्म जगण्याचे अजून समजलेच नाही ** काय ते मारावे आपल्याच माणसांना हे तत्वज्ञान पार्थास पटलेच नाही ** ना मारणारा ना कोण मरणारा येथे या साऱ्याचा दोष तुजला मुळीच नाही ** तु एव्हढेच कर जे तुझे कर्म आहे नको फळाची अपेक्षा कसलिच नाही ** गीता हे सार जीवनाचे जगण्याचे आणि जगणे याहून दुसरेच नाही ** जे आहे त्यात समाधान माझे आहे अहित दुसऱ्याचे मला अपेक्षितच नाही ** नको फुल ना पान; घे नाम माझे मुखाने अखंड नामाने माझ्या पुनर्जन्मच नाही ** उगा शोधतो तु मजला राऊळा देऊळात तुझ्या भवतीच आहे अन्य कोठेच नाही ** राज्य होते अधर्माचे जेंव्हा "प्रकाशा" मीच जन्म घेतो अन्य कोणीच नाही ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे जगणे अजून समजलेच नाही ...!
somnath gawade
अजून मी मलाच नाही कळलो. इतरांनी मला कळून घेतले; परंतु, अजून मी मलाच नाही कळलो. कुणी काही म्हणा; प्रत्येकाच्या मदतीसाठी मी दुःख सारे विसरून आहे वळलो. अपेक्षा ठेऊन काम करण्यासाठी मी कधीच नाही धजलो. खोटी प्रशंसा करणाऱ्यांपासून मी मात्र आहे पळलो. नवीन वाट शोधण्याच्या इच्छेने मी जुन्या वाटेवरती कधीच नाही रुळलो. लोकं म्हणतात सारे, मी तुला ओळखून आहे. त्यांना जसा मी कळलो, तसा अजून मी स्वतःलाच नाही कळलो. #अजून मी मलाच कळलो नाही.
Omkar Kapase
वेळ आत्ता थांबत नाही धिर आत्ता धरवत नाही। अगं सगळं मला माहितीय? अगं तुला कसे हो म्हणणार अजून पहिलीलाच विसरलो नाही।। हक्काने बायको म्हणता यावी अशी girlfriend तुलाच बनवणार। अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।। लाख असतील राधा माझ्या पण लग्न मात्र परी सारख्या रुक्मीणी बरोबर करणार। अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।। ताजमहालच काय, तुझ्यासाठी राजवाडा बांधणार, अग्नीच्या साक्षीने मात्र सात जन्म साथ तुझीच देणार। अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।। तुझ्यासाठी चंद्रतारेच काय, दिवस रात्र एक करणार। आत्ता येथुन पुढे बघ तु, तुझ्या मनावर राज्य मीच करणार।। पण काय करणार, अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।। मन सैरभैरः- ओंकार कापसे अगं अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!
अल्पेश सोलकर
सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes
Vaibhav Thakre
वाटेवरी उभा होतोच मी तिथे तू आलीस नाही जराही आजचा रात्री तू कुठे अन मी कुठे या दोन्ही किनाऱ्यावरती तू कुठे अन मी कुठे दोन्ही किनाऱ्यावरती काटे होते जरा होती नाही माझ्याकडे तुझा आठवांचा डावरे तुझ्या आठवणी सोडून गेली तू मला तेव्हा मी तिथेच थांबलो होतो वाटेवरी तुझ्या तुझी वाट पाहत थांबलो होतो तू दिसलीस मला जरी नकळत माझे मन तुला शोधत होते होते तुला शोधता-शोधता माझ्यात मी हरवलो आहे का कुणास ठाऊक मी कुठे हरवलो आहे मी कुठे हरवलो आहे कवी मित्र वैभव ठाकरे माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट
Vaibhav Thakre