Find the Latest Status about रामनवमीच्या अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रामनवमीच्या अभंग.
Sangeeta Kalbhor
अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार भावना भेटता भावनेला होते की रे गरवार सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा
Mohan Somalkar
लावियल्या ज्योती (अभंग) लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥ हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥ आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥ अभंगातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥ दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥ चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥ नको राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥ भजनातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥ मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥ गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥ हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥ पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥ एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥ हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
अभंग ३ ( चादर) आपुल्या इच्छेला॥ मर्यादा असावी॥ भरारी मारावी॥ सांभाळून ॥१॥ पाय पसरावे ॥ पाहुन चादर ॥ मोठ्यांचा आदर ॥ सदा असो॥२॥ नको उतमाज ॥ स्थितीचा अंदाज ॥ मनाचा आवाज ॥ ओळखावा॥३॥ मोहमयी जग॥ दुरच रहावे॥ विचार करावे॥ जीवनात ॥४॥ साधुसंत सांगे ॥ जगण्याची रित ॥ छोटेशे गणित ॥ आयुष्याचे ॥५॥ बोले माझा साई ॥ खुप होती शक्ती॥ लोक करे भक्ती॥ ऐकोप्याने॥६॥ पाण्यातुन दिवे॥ साईने लाविले ॥ अमृत पाजिले॥ ज्ञानाचेच॥७॥ मर्यादित इच्छा ॥ साई म्हणे ऐसा॥ मंत्र ऐका तैसा ॥ जगण्याचा ॥८॥ इच्छेची चादर ॥ मर्यादित ठेवा ॥ समजुन घ्यावा ॥ महामंत्र ॥९॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # अभंग