Find the Latest Status about रामनवमीच्या अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रामनवमीच्या अभंग.
Sangeeta Kalbhor
अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळाच रे मुरारी मखमल तुझ्या लोचणी अलवार मी पांघरते क्षणभराची साथ तुझी फार मुश्किलीने आवरते मिठीत होते गुडूप जेव्हा माझा वसंत तू होतो बहर रोमरोमी अन् मनी माझा आसमंत तू होतो नाही ठाऊक मजला चूक काय नि काय बरोबर माझ्या काळजातला तू अथांग पसरलेला सरोवर लट होते बावरी स्पर्शिता तू तिला अलवार भावना भेटता भावनेला होते की रे गरवार सहस्त्र श्वासांचे मिलन प्रणयाला येतो रंग मनामनाच्या मिलनाला रहावेच लागेल अभंग..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा
Mohan Somalkar
*भा. सा. व सांस्कृतिक मंच नागपूर आयोजित काव्य लेखन उपक्रम* *काव्य प्रकार _अभंग लेखन* *विषय _दिनू सोनियाचा* आळंदी देवाची/ संजीवन धाम / घेत हरिनाम/ ज्ञानेशाचे//१ वद्य त्रयोदशी /दिनू सोनियाचा/ कार्तिक मासाचा/समाधीचा//२ इंद्रायणी काठी/ उत्सव चालला/ भक्तांचा लोटला/ महापूर//३ ज्ञानदेवा दिली /भाषेची मराठी/ सर्व जनासाठी/ ज्ञानेश्वरी//४ साहित्य महंत/ सामर्थ्य भाषेचे / रुप लालित्येचे / दावियले//५ पसायदान हे/ विश्व कल्याणासी/ हेच देवापाशी/ मागितले //६ ज्ञानाची महती / ज्ञानेश्वरी जशी/ चौदाव्या त्या वर्षी/ पुर्ण केली//७ विठ्ठल दैवत / गुरु हे निवृत्ती/ जागवी प्रवृत्ती/ त्यांचे ठाई //८ विचार ज्ञानाचे/ करु अवगत/ प्रकाश सांगत / महतीचे //९ डॉ.प्रकाश पांडे वाशीम ©Mohan Somalkar #अभंग
Rajendrakumar Jagannath Bhosale
आजचा अभंग नोहे उपमा अमृताचा सागर,केला परीसपर्वताचा आगर ईश्वरी ज्ञानाचा करता जागर, ज्ञानेश्वरी ll धृ ll कर्म , भक्ती , सांख्य, ध्यान, , योग, शांत अद्भुत,गूढ, सत्य , संजोग अलौकिक विश्र्वदर्शनाचा भोग, गीतातत्वे ll १ll चिरंतन ईश्वर सत्याचा आरा, मायेचा सत्राविचा मस्तकी झरा हरी ओम तत्सत सोहम फेरा, राजे म्हणे ll २ll कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो . क्र.9325584845 ©Rajendrakumar Jagannath Bhosale आजचा अभंग
Devanand Jadhav
*ll अक्षरक्रांती अभंग महोत्सव ll* ll २०२३ ll ll सातवा अभंग ll ll गुरु दि. ७ सप्टेंबर २०२३ ll ll आजचा अभंग ll °मज लागो देवा° मज लागो देवा l सेवेचिये गोडी ॥* गाईन आवडी l तुझे नाम ॥ १ ॥ गोड तुझे नाम l असो माझे ओठी ll आशीर्वाद पाठी l असू द्यावा ॥ २ ॥ भवातूनी मज l तूच आता सोड ll लागू दे रे ओढ l हरी नाम ॥ ३ ॥ कैवल्याचा राणा l जरी ना भेटला ll तरीही साठला l भक्तिभाव ॥ ४ ॥ अंतरित ध्यान l रोज करताहे ll तुज पाहताहे l दाही दिशा ॥ ५ ॥ भवातून मुक्ती l तूच दे रे आता ll तूचि असे दाता l पामरांचा ॥ ६ ॥ ©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा l सेवेचिये गोडी ll गाईन आवडी l तुझे नाम ॥ #janmashtami #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #
Devanand Jadhav
°अभंग~अलौकिक विट° परब्रह्म येता, पुंडलिका भेटी धरियले वेठी, पांडुरंगा ll फेकुनिया विट, बोलिले केशवा उभेच रहावा, तीजवरी ll युगे युगे झाली, स्थिरावली विट तरी नसे वीट, दोन्ही देही ll पंढरीचा राणा, तीजवरी उभा सान जरी गाभा, तरी स्थिर ll किती ती अवीट, काय काय वर्णू पदस्पर्शी स्वर्णू, देह झाला ll चौदा युगे पायी, तुडविली काया उभ्याचीच छाया, तिजवरी ll असे जरी तिचे, मातीचेच रूप झाली ती अनूप, देवा पायी ll ✍🏻©®•देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अभंग : वीट आणि विट...
Sarita Prashant Gokhale
देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले देवराज विठ्ठलास एकदा विचारले संकटात पामरास का असेच टाकले का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले तू मलाच सांग आज साकड्यात टाकले एक नाम अंतरात मी सदैव जोडले मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले दर्शनात मी समोर एक रूप पाहिले जीवनात मायबाप विठ्ठलास मानले सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो पुण्यवान लेकरास आसपास वाटतो साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो पंढरीत एक देव या जगास तारतो ©Sarita Prashant Gokhale देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे
Devanand Jadhav
°मज लागो देवा° मज लागो देवा । सेवेचिये गोडी । गाईन आवडी । तुझे नाम ॥ गोड तुझे नाम । असो माझे ओठी । आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ भवातूनी मज । तूच आता सोड । लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ कैवल्याचा राणा । जरी ना भेटला । तरही साठला । भक्तिभाव ॥ अंतरित ध्यान । रोज करताहे । तुज पाहताहे । दाही दिशा ॥ भवातून मुक्ती । तूच दे रे आता । तूचि असे दाता । पामरांचा ॥ भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी । तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ मनोभावे रोज । करताहे सेवा । रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 9892800137 ©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...
Devanand Jadhav
°मज लागो देवा° मज लागो देवा । सेवेचिये गोडी । गाईन आवडी । तुझे नाम ॥ गोड तुझे नाम । असो माझे ओठी । आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ भवातूनी मज । तूच आता सोड । लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ कैवल्याचा राणा । जरी ना भेटला । तरही साठला । भक्तिभाव ॥ अंतरित ध्यान । रोज करताहे । तुज पाहताहे । दाही दिशा ॥ भवातून मुक्ती । तूच दे रे आता । तूचि असे दाता । पामरांचा ॥ भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी । तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ मनोभावे रोज । करताहे सेवा । रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 9892800137 ©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...