Find the Latest Status about तेहरी लेक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेहरी लेक.
Archana Deshpande-Pol
लेक लाडकी गं माझी.. आज निघाली सासूरा.. दारी थांबते पाऊल, उरी हुंदका गहिरा. काळजाचा तुकडा तो, कसा जपला लाडात, माप ओलांडून आज, जाई परक्या घरात.. माय बापाचं कौतुक, डोळाकाठात सांडलं. भरलेल्या काळजानं प्रेम मिठीत कोंडलं.. लेक मायेचं अंगण.. गंध सासरी सांडतो. ठेच लागता लेकीला, बाप मनात रडतो. लेक असावी मायेची, तीच्यासाठी मोहरावे.. तीच्या हसण्याने पुन्हा, माझे अंगण फुलावे.. ©अर्चू.. #लेक
Dr Mangesh Kankonkar
दारासमोर अंगणा मध्ये सुबक रांगोळी दिसावी प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी मुलगी असावी मुलगी म्हणजे घरासाठी जीव की प्राण तिला पाहून हरपून जातं सारं देहभान मुलगी घरात असली म्हणजे घर कसं फुलून जातं तिचं असणं घरासाठी चंदनाच लेप होतं मुलगी करते चिवचिवाट म्हणून घर फुलून येतं असो अथवा नसो काही मन कसं भरून जातं आई बाबांच्या म्हातारपणी मुलगीच त्यांची आई घर कितीही मोठं आसो मुली शिवाय श्रीमंती नाही मुलीसाठी देवासमोर हात जोडून बसलं पाहिजे प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीच रोप असलं पाहिजे माझी लेक
माझी लेक #कविता
read moresomnath gawade
सावित्रीची लेक तु सावित्रीची लेक तु, अभाळात मुक्त भरारी घे. स्त्री शक्तीची चुणूक दाखवून अवघं विश्व मुठीत घे. अडथळे कितीही आले तरी, माघार घेऊ नकोस. आपल्याला जिंकायचं आहे, हे कधी विसरू नकोस. प्रवास खडतर असणार, याची जाणीव ठेव. यशाला गवसणी घालायची, यासाठी रोजचा सराव सुरू ठेव. अपयश आले तरी खचू नकोस, पुन्हा बळ एकवटून तयार हो. थोडी उसंत घेऊन, यशाची भरारी घेण्यास सज्ज हो. टोमणे-टचके चालू राहतील तु रीतसर कानाडोळा कर. सावित्रीची लेक तू यशाचा एव्हरेस्ट सर कर. स्त्री, पुरुष समानतेचा जागर सर्वत्र घुमतोय. तुझं अस्तित्व सिद्ध करण्या तो तुला खुणावतोय. #सावित्रीची लेक तु
#सावित्रीची लेक तु
read morevaishali
आजच्या प्रत्येक स्त्री मध्ये दडली आहे एक सावित्री खोल अंतर्मनात बघ डोकावून तुला ही याची होईल खात्री जाणून घे , समजून घे तुझ्याच मनातील सल ढवळून बघ एकदा तुझ्याच मनाचा तळ अस्तित्व तुझे तुला तिथे नक्कीच सापडेल तेव्हा येथे पुन्हा पुन्हा एक नव्याने सावित्री घडेल शोध त्या सावित्रीचा तुझा तुलाच घ्यावा लागेल आठवून बघ तिला एकदा तुझ्यातली सावित्री नक्की जागेल घडवुनी नवा इतिहास चढ यशाचे शिखर त्याच सावित्रीची लेक तू चल आज हे सिध्द कर सावित्रीची लेक तू #मराठीकविता
सावित्रीची लेक तू #मराठीकविता
read more