Nojoto: Largest Storytelling Platform

New सीमेवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सीमेवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सीमेवर.

Related Stories

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

सीमेवरील जवान #IndianArmy #मराठीकविता

read more
सीमेवरील जवान

रक्तबंबाळ होतो जवान माझा
सीमेवरती लढताना...
श्र्वास अखेरचा सोडतो आठवत
उंबरठा घरचा ओलांडताना..
            
असेल ती चुलीपाशी अन् माय गोठ्यात
नांगर ओढतोय बाप शेतामध्ये
गुरं नि ढोरं चरताना ‌अन्
तान्हं रडताना दारामध्ये
             
सांडत होते अश्रू अबोल ते
डोळे होते नभाकडे
दिली आहूती या प्राणाची 
काय मागू या देशाकडे
               
व्यर्थ ना हो जाए बलीदान
आहुती देतोय रोज एक जवान
या धरतीचे पुत्र तुम्ही ही
व्हा जागे..आत्मनिर्भर अन् बलवान
                
विसावतोय मी कुशीत माईच्या
देश कुटुंब तुमच्या हवाली
थेंब न सोडणारे तुम्ही रक्ताचा
कोण करणार देशाची रखवाली?

✍️निशा शिंदे/खरात

©nisha Kharatshinde सीमेवरील जवान

#IndianArmy

Anjali Maideo

काल सीमेवर संपला श्वास होता #poem

read more

vaishali

*सीमेवरील प्रत्येक सैनिक बंधूना समर्पित* 🙏🏻

read more
औक्षण

नात बहीण भावाच असे किती किती गोड
असे बहिणीला सदा भाऊरायचीच ओढ

कधी येशील भाऊराया वाट पाहते बहीण
तुझ्याविना माझा सुना सुना रे हा सण

डोळे लागले वाटेला माझे आतुरले मन
आठवण तुझी  भाऊराया येते क्षणो क्षण

अडकलास कर्तव्यात नाही येणार तू या घडी
घेऊन आरतीचे ताट वाट पाहते बहीण ही वेडी

देशसेवेसाठी तुझे तू अर्पिले रे जीवन
तना मनाने करतो माझ्या मायभूमीचे रक्षण

नाही कमजोर धागा हा तर रेशमी बंध
तुझ्या घामाला ही येई माझ्या मातीचा सुगंध

सीमेवरील माझ्या प्रत्येक भावाचे देवा कर तू रक्षण
त्याच्या दीर्घायुष्यासाठी करते येथूनच औक्षण

माया या बहिणीची सदा आहे तुझ्या पाठीशी
नाते तुझे माझे असे मनाचे मनाशी

माझ्या राखीचा भाऊराया ठेऊनिया मान
कर देशाची तू सेवा तुझा आम्हा अभिमान

कधी मानू नकोस हार , लाव प्राणाची बाजी मायभूमीच्या रक्षणी
नको काही मज दुसरे , दे हीच ओवाळणी

शब्दसंगिनी 
✍️ सौ.वैशाली साळुंखे
         *सीमेवरील प्रत्येक सैनिक बंधूना समर्पित* 🙏🏻

Brand Sardars BSF President

Famous Army poet.. उभा आहे सीमेवर... #poem

read more

RJ कैलास नाईक

आताच तर आला होता ना ग आई,सीमेवरून खुशालीचा फोन.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार शब्द.. #चारशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चार शब्द त्यांच्यासाठी,
पुरे पडतील का.
आभार त्यांचे शब्दात मावतील का.
चारच शब्द त्यांच्यासाठी,
जे झटतात आपल्या सुरक्षेसाठी.
अहोरात्र सेवा देतात,
वेळप्रसंगी उपाशी ही राहतात.
कसलीच अपेक्षा नाही,
मनातले त्यांच्या कुणीच जाणत नाही.
आपले ही आता कर्तव्य आहे,
जिथे आहे तिथेच राहणे आहे.
धन्यवादाचे चार शब्द त्यांच्यासाठी ही
जे सीमेवर लढत आहेत आपल्यासाठी.
आपल्याला मात्र दारातच लढणे आहे.
दिल्यात ज्या सूचना त्या पाळणे आहे.
आपली सुरक्षा ही आपल्या हाती आहे,
विनाकारण बाहेर निघालं तर काठी आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चार शब्द..
#चारशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile