Nojoto: Largest Storytelling Platform

New ना राहून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ना राहून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ना राहून.

Stories related to ना राहून

    LatestPopularVideo

dinesh Rajiram gajbhiye

राहून गेले

read more
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले
 लपविलेले मजकूर ते वाचून गेले

 आसवांना मी न दाखविले कधीही
घरटे भावनांचे आज का वाहून गेले

संकटात साथ सोडली न मी कधीही
जात आपली जातांना दाखवून गेले

जीवलग होतो त्यांचा मी  एकेकाळी
ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले






बरं मातून गेले राहून गेले

सोपान ओव्हाळ.

जगणे राहून गेले

read more
जगणे माझे राहून गेले
मरण मला जिंकून गेले
राहीले होते स्वप्न अधूरे
भाग आयूष्याचे संपून गेले

sopan जगणे राहून गेले

अश्लेष माडे (प्रीत कवी )

जगायचंच राहून गेलं

read more

Nishant Tendolkar

कविता राहून गेली

read more
कविता राहून गेली..


स्मरते अजुन आहे.
शब्दांच्या गाठीभेटी
चांदीचे भरले दाणे
आळवाच्या नाजुक देठी

पोळणारे पाय माझे
उन्हातल्या आचेवरी
पावसाचे गहिरे डाग
जळलेल्या या त्वचेवरी

ओंजळीत सुगंधी आहे
अजुनी मोगरा टपोरा
तु कविता लिहायला दिलेला
कागद अजूनही कोरा


डोळ्यामधील आसवे मग
वाटांना पुसती खुशाली
दूरच्या प्रवासा द्यायची
ती कविता राहुन गेली.

- निशांत तेंडोलकर कविता राहून गेली

nisha Kharatshinde

एक स्वप्न राहून गेले #मराठीकविता

read more
एक स्वप्न राहून गेले

आज करेन उद्या करेन
दिवसमात्र सरत गेले
एक पाहिलेले स्वप्न माझे
स्वचुकीमुळे राहून गेले

खूप आहे आयुष्य अजून
मनाला समजवत गेले
भिंतीवरील वेळदर्शक 
काम त्याचे करून गेले

दिवस रात्र संपता संपता 
ऊन पावसाळे येऊन गेले
सुरकुतलेलं शरीर पाहून
स्वप्न माझे रडून गेले

आयुष्य आज मला 
खूप काही सांगून गेले
आळस तुझा शत्रू आहे
ओरडून क्षणात संपून गेले

आज करेन उद्या करेन
दिवसमात्र सरत गेले
एक पाहिलेले स्वप्न माझे
स्वचुकीमुळे राहून गेले

✍️ निशा खरात/शिंदे
     काव्यनिश(अलोरे.. चिपळूण)

©nisha Kharatshinde एक स्वप्न राहून गेले

Harishchandra Dalvi

एक राहून गेलेली मिठी #Life_experience

read more
एखाद्या  भयाण संकटाला पुरून उरणे
त्याचा नाश आणि बिमोड करणे
हे नेहमीच सोपे वाटते 
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबासोबत बोलणे ,राहणे ,
त्याच्यासोबत भांडणे ,त्यांतून प्रेम मिळवणे
हे नेहमीच सोपे वाटते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

एखादा यशाचा शिखर गाठणे
त्यावर विजय पताका लावणे 
हे नेहमीच सोपे भासते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबांच्या मनात येत असेल
मुलांचे आपल्यावर खूप प्रेम असेल
समोर दिसताच तो आपल्या कुशीत बसेल
मुलांना मिठीत घेणे बाबांचा पण हाच हेतू असेल
पण मुलांना मनात येत असेल की 
बाबांच्या मिठीत जाणे बाबांना कसे वाटत असेल

शेवटी राहून जाते ती मिठी
आणि खूप काही बोलायचे असते
योग्य ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते
आणि बाबांना मिठी मारण्याची वेळ चुकलेली असते

योग्य वेळ असतानाच ज्याच्या एक विचार मनात येईल
बाबांच्या एक वेळ तरी जो त्यांच्या मिठीत जाईल
तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित हास्य येईल
प्रेमळ हेवेदावे एक नवे रूप घेईल
बाबांना मारलेली मिठी ही नेहमीच लक्षात राहील
म्हणूनच बाबांच्या मिठीत जो जाईल तो नेहमी खुश राहिल


कवी हरिश्चंद्र मुकुंद दळवी
मु. डोंगरन्हावे,पोस्ट म्हसा,
तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे (421401)
साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व
कला शाखा तृतीय वर्ष अर्थशास्त्र विभाग
9503584135 एक राहून गेलेली मिठी

गोरक्ष अशोक उंबरकर

जगायचं थोड राहून जातं #मराठीकविता

read more

nisha Kharatshinde

एक स्वप्न राहून गेले #मराठीकविता

read more
एक स्वप्न राहून गेले

आज करेन उद्या करेन
दिवसमात्र सरत गेले
एक पाहिलेले स्वप्न माझे
स्वचुकीमुळे राहून गेले

खूप आहे आयुष्य अजून
मनाला समजवत गेले
भिंतीवरील वेळदर्शक 
काम त्याचे करून गेले

दिवस रात्र संपता संपता 
ऊन पावसाळे येऊन गेले
सुरकुतलेलं शरीर पाहून
स्वप्न माझे रडून गेले

आयुष्य आज मला 
खूप काही सांगून गेले
आळस तुझा शत्रू आहे
ओरडून क्षणात संपून गेले

आज करेन उद्या करेन
दिवसमात्र सरत गेले
एक पाहिलेले स्वप्न माझे
स्वचुकीमुळे राहून गेले

✍️ निशा खरात/शिंदे
     काव्यनिश

©nisha Kharatshinde एक स्वप्न राहून गेले

balu kamble

खर प्रेम कारायच राहून गेलं

read more

Devanand Jadhav

जे सांगायचे ते राहून गेले... #मराठीप्रेम

read more
झाले अबोल शब्द 
तुझिया ओठातले 
ना बोलले तरीही 
सडा शिंपीत गेले 

शिंपल्या सड्यातच
मन भिजून गेले 
जे तुला सांगायचे 
तेच राहून गेले 

•देवानंद जाधव•
jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav जे सांगायचे ते राहून गेले...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile