Nojoto: Largest Storytelling Platform

New चिऊताई चिऊताई अंगणात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिऊताई चिऊताई अंगणात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिऊताई चिऊताई अंगणात.

Stories related to चिऊताई चिऊताई अंगणात

    LatestPopularVideo

Priyanka Jaiswal

कवी - के. गणेश

चिऊताई..

read more
चिऊताई..

अगं अगं चिऊताई
ये आमच्या घरी..
बाळ वाट पाहतंय
तुझी दारावरी..

चिऊताई तू घे
बाळाचा ग घास..
माझ्या तान्हूल्याला
तुझी लागली आस..

बाळ माझं इवलं
वाट तुझी पाही..
कानी येता किलबिल
कसं बावरून जाई..

तुझं दारावर येणं
जशी सुखाची झुळूक..
पान हलेना झाडाचं
वारा रुसला आपसूक..

चिऊताई आमच्या घरी
कर ना ग खोपा..
माझं तान्हं घेईन
तुझ्या बाळाचा पापा..

चिऊताई कशी गेली        copyright @kganesh
भुर्रकन उडून..              902811059
माझं बाळ दमलय
रडून रडून...! चिऊताई..

Avinash lad

चिऊताई..

read more
चिऊताई...
-------------------------------

चिऊताई चिऊताई
ये माझ्या घरी,
देईनतुला दाणे पाणी
मग  जा  ग  माघारी..........!!१!!

अंगणात आल्यावर
वाटतं छान मला,
तू उड्या मारल्यावर
देईन खाऊ ग  तुला...........!!२!!

इवल्या तुझ्या पायांची
गम्मत आहे भारी,
दाणे टिपून झाल्यावर
भुर्रर्र  मारतेस भरारी..........!!३!!

चोच छोटुली ग तुझी
पंख दोन छान,
खेळतांना साऱ्यांचे
तू  हरवतेस   भान...........!!४!!

चिऊताई चिऊताई
बांध घराजवळ घरट,
रोज तुझी सकाळी 
पाहीन अंगणात वाट.........!!५!!

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ चिऊताई..

Pratik Patil Patu

चिऊताई..

देवाने पाठवलं चिऊला
जगाचा उद्धार करायला
चिऊ होती पोटात
तेव्हाच झाला घात!

चिऊ देवाचा अवतार
करायला जगाचा उद्धार
पृथ्वी वर ती आली, आणि
जन्मापूर्वीच मारली गेली!

येणार नाही देव
येणार फक्त चिऊ
कसे कळेना कोणास
चिऊ देवाचाच जीव!

चिऊ-ताई तुझ्यावीना
देश मोडका कना
माझी एक विनंती
जन्म घेऊ द्या ना तिला!

जरी घेतला जन्म 
 तरी, जगू द्या ना तिला!
गोड जगता-जगता
छान शिकू द्या ना तिला! चिऊताई...
#savegirlchild 
#मुलगी 
#स्त्रीभ्रूणहत्याथांबवा

शुभम महादेव काप

कविता :- चिऊताई कवी :- शुभम म. काप #poem

read more
चिऊताई

कित्येक वर्ष गायब होतीस गं
चिऊताई तू गावातूनी,
माणसांनीच केली होती घोडचूक
शिवारांवर औषधे फवारुनी.

इकडून-तिकडून फिरायचीस तू
उपाशीपोटी अन्नाविना,
ओसाड होती रानोमाळं
तुझ्या त्या घरट्याविना.

गेली होतीस तू गाव सोडूनी
प्रदूषणाच्या त्या शहराला,
हाल-अपेष्टा सोसल्यास गं तू
पण गाव मात्र पोरका झाला.

खुप दिवसांनी पहायला मिळालं
तुझं हे गोजिरवाणं रुप
तुझं हे सुंदर रुप पाहण्यासाठी
मनाला ओढ लागली होती खुप.

सकाळच्या त्या सुंदर प्रहरी
तुझा तो किलबिलाट ऐकायला येतो,
चिवचिव करणारा तुझा तो मंजूळ आवाज 
सर्वांनाच आता हवाहवासा वाटतो.

नको जाऊस गं पुन्हा अशी कधी
गाव-रानोमाळ  सोडूनी,
गजबजलेलं राहूदे हे परिसर 
तुझ्या त्या सहवासानी.

-(शुभम महादेव काप) कविता :- चिऊताई
कवी :- शुभम म. काप

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि

read more
आभाळाने पुकारले
चिऊताई चिऊताई परत ये...
रुसूबाई रुसूबाई रुसलीस का...
चिव चिव करायला परत ये...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक चिमणी दिन...
वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि

read more
आभाळाने पुकारले
चिऊताई चिऊताई परत ये...
रुसूबाई रुसूबाई रुसलीस का...
चिव चिव करायला परत ये...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक चिमणी दिन...
वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि

Vinod Umratkar

माझ्या अंगणात काल रात्री पाऊस पडला likes नी comments चा #yqbaba #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Smita Kadlakh

read more
पडलाच नाही आमच्याकडे,काल रात्रीचा तो पाऊस 
कोरडेच आम्ही, अन भिजण्याची ती कोरडी  हौस माझ्या अंगणात काल रात्री पाऊस पडला likes नी comments चा
#yqbaba #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with Smita Kadlakh

अल्पेश सोलकर

आता या गुलाबाच्या फुलाला तुझ्यात अंगणात उगवायचे होते का.. जिला द्यायचं आहे ..तिच्याच अंगणातील फूल तोडण बरं नव्हे ना...!

read more
आता या गुलाबाच्या फुलाला
तुझ्यात अंगणात 
उगवायचे होते का..
जिला द्यायचं आहे ..तिच्याच 
अंगणातील फूल तोडण
बरं नव्हे ना...! आता या गुलाबाच्या फुलाला
तुझ्यात अंगणात 
उगवायचे होते का..
जिला द्यायचं आहे ..तिच्याच 
अंगणातील फूल तोडण
बरं नव्हे ना...!

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
अंगणात माझ्या मनाच्या
ती सतत वावरत असते,
नजरेसमोर नसतानाही
सतत समोर दिसत असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अंगणात माझ्या..
#अंगणातमाझ्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin
loader
Home
Explore
Events
Notification
Profile