Nojoto: Largest Storytelling Platform

New लपंडाव निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लपंडाव निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लपंडाव निबंध.

Related Stories

    LatestPopularVideo

Vikas Yadav

लपंडाव #story

read more
"बैलपोळा" किंवा "बेंदुर "
आजकाल च्या भाषेत सांगायचे झाल तर "बैल डे" म्हणा हव तर. ह्याची किती excitement असायची हे शब्दांत सांगायचे आता तर खूप अवघड आहे. 2 बैल आमच्याही घरी होते. शेतकर्‍याची गाडी खरोखरच पार लावत ही बैल. पेरणीचा येवढा रगडा असतो की त्यांना खरोखर एक दिवस आराम तर दिलाच पाहिजे. किती प्रेम आणि काळजी असते त्यांची ही गोष्ट दाखवू तर नाही शकत पण व्यक्त करायला एक संधी असते. आदल्या रात्री पासूनच खर सुरुवात व्हायची खांदा मळण्यापासून. अरे दुसर्‍या दिवशी एकदम पहाटे पहाटे त्यांना शाही आंघोळ डोंगराकडेच्या तलावात. एक स्पेशल lifebuoy च्या साबणाने ते पन. पांढरी शुभ्र धुवून निघायची  जोडी एकदम. तिथून घरी गेल्यावर मात्र टेंशन की गोठ्यात खाली बसला तर परत कस धुणार ह्याच अंग खराब करून घेतले तर. मग त्यांची रंग रंगोटी. अंगावर उठवलेले छाप तर एकदम बघण्यासारखे असायचे. झूल अंगावर टाकल्या नंतर तर नाद खुळा. सगळ्यात राडेबाज भाग म्हणजे त्यांची मिरवणूक. प्रत्येक आळीची एक वेगळी शान असायची. त्याच्यावरून होणारी भांडणे पण मजेदार असायची. ह्या सगळ्यात 2 - 3 बेवडे असणारच अणि त्यांचा स्पेशल नागिन डान्स शिवाय तर मिरवणूक पूर्णच होवू शकत नाही. गावातील देवापुढे त्यांना बुजवण्यासाठी जी मजा होती ती काही औरच. ते सगळे झाल की एक फोटोग्राफी चा सेशन्स पण असायचा. ते फॅमिली फोटो खरे जबरदस्त होते. ती खरी complete फॅमिली होती.... लपंडाव

Vikas Yadav

लपंडाव #कहानी

read more
गुरुवार चा रंगीत ड्रेस असायचा शाळेत. सगळे कसे एकदम झाकपाक दिसायचे. एकदम कलर फुल दिसायचे समोरून बघितले तर. मी त्या दिवशी हमखास ते दिनविशेष वाचायला जायचो अणि सगळ्यात चांगले कोण दिसणार दुसरे मला म्हणुन फक्त. ना कसली फॅशन त्यावेळी ना कसला ट्रेंड ना कसला हॅश टॅग. खर सांगायचे तर किती फालतू जगात आहोत आपण. किती साध सरळ होत जीवन नाही त्या भानगडी करून बसलोय. खरा कलर तर गावातल्या त्या डोंगराचा, तिने मळलेल्या गुलाबाच्या फुलाचा, काळ्या फळ्यावर हिरव्या कलर ने लिहिलेल्या "सुविचार " ह्या शब्दाचा. खर तर गुरुवार नेहमीच विशेष वाटायचा कारण त्याच दिवशी ती मस्त अश्या तिच्या गुलाबी ड्रेस मध्ये यायची अणि अजूनच सुंदर दिसायची. खर तर एकदा सांगायचे होत तिला की ह्या ड्रेस वर ती मला एकदम माधुरी दीक्षित वाटायची. राहिले ते पन नाही सांगता आले. आता मात्र त्या गुरुवार ची फक्त आठवण आहे. कलर वैगेरे म्हणाल तर आता काही वाटतच नाही... लपंडाव

Vikas Yadav

लपंडाव.. #story

read more
"आसान बहोत हे बाते करना
निभा सके तो मानू तेरा कहना"
  बस हे माझ उत्तर होत तिला तिने लिहिलेल्या त्या पत्राला. आता ह्या सगळ्या गडबडीत आमचे लक्ष गेल नाही ते म्हणजे अर्जुन च्या नावाने लिहलेली एक चिठ्ठी कोणीतरी त्याच्या आवडत्या मुलीच्या दफ्तरात ठेवली होती अणि ती येवढी शहाणी निघाली की तिने ती त्याला परत माघारी दिली होती. No pain no gain. पण हा मान्य करायला तयार नव्हता त्यान लिहिलय म्हणुन. खर की खोट ते जावू द्या कोणाची आयडिया होती की अर्जुनाचा स्वतःचा मारलेला बाण होता हे प्रकरण चर्चेत आले होत. कधी कधी bad publicity कामाला येते तसाच काहीतरी पण त्याच्या फायदाच झाला होता. ती खरोखर आता भिडू लागली होती अणि योगायोग म्हणजे तो राहत होता त्याच रस्त्याला तीच घर होता मग काय होणार येता जाता तिने पण मागे वळून बघायला सुरुवात तर केली होती लपंडाव..

Vikas Yadav

लपंडाव #story

read more
तिने लिहिलेल्या दोन ओळी किती जबरदस्त होत्या माझ्यासाठी तसही आपल्या आवडत्या व्यक्तींची प्रत्येक गोष्ट आवडतेच ना आपल्याला.
"पत्थर की लकीर हो या लकीरो का पत्थर,
हम तो आपके हे कल भी आज भी और जिंदगी भर". तिच्यामुळे शाळेत जायची येवढी सवय झाली होती की घरातल्यांना पण doubt झाला होता की मी नक्की शाळेतच जातो का? ही स्टोरी फक्त प्रेमाची आहे. प्रेम प्रत्येकाचे दोघांचे, मित्रांचे अणि शाळेचे. आता ह्याच काय उत्तर द्यायचे त्यापेक्षा मी किती स्पेशल होतो तिच्यासाठी ही feeling ch खूप प्रेमळ होती. सगळ्यानी feel केली असेलच. आताची जी race आहे त्यापेक्षा मला त्यावेळी शाळेत येतानाची रेस खूप भारी वाटते. हे विसरून कस चालेल प्रेम तर सगळ्याच लोकाना होत. आता माझ्या सारखीच सगळ्यांची स्टोरी होती त्यावेळी फक्त एकमेकाला न सांगता गुपचूप चालू होत. सगळीच मांजरे होती डोळे झाकून दूध पिणारी जस की कोणीच कोणाला बघत नव्हते... लपंडाव

Vikas Yadav

लपंडाव #story

read more
प्यार का पहला खत लिखने मे वक्त तो लगता हे,
नये परींदो को उडने मे वक्त तो लगता हे,
जिस्म की बात नही थी उनके दिल तक जाना था,
लंबी दूरी तय करने मे वक्त तो लगता हे..
ही जादू शब्दांची ही जादू गजल सम्राट जगजीतसिंहाची पण. ही गजल ज्याने ऐकली नसेल त्याच जगणे व्यर्थ म्हंटलं पाहिजे. पण गजल अणि हे त्यावेळी ना माहीत होत ना त्याचा येवढा अर्थ माहीत होता. होत ते फक्त दोघांच एकमेकावर प्रेम जे आमच्या दोघांच्या व्याख्या मधील. असो पण पहिले प्रेम पत्र खरच अवघड असते लिहायला अणि ते त्या व्यक्तिला द्यायला. म्हणजे आजकाल काय राहिल नाही मी सांगतोय ती गोष्ट आहे 2002 ची त्यावेळी तरीपण ठीक होत हे टेंशन होत खरोखर आजच्या सारखे नाही 3 massge मध्ये स्टोरी संपली. आता तो दगड आजही लक्ष्यात आहे म्हणण्या पेक्षा ते जे लिखाण होत दगडाने  दगडावरती लिहलेली... Can u people imagine that letter of love written with stone. असे म्हणतात की लोग पत्थर दिल होते हे. पण आमची दिल की स्टोरी ही पत्थर पे लिखी थी.. लपंडाव

Vikas Yadav

लपंडाव... #story

read more
फायनली आमच्या चाचणी परीक्षा झाल्या होत्या. ह्या वेळी किती मार्क पडणार होते माहित नाही कारण पण तसच होत. शेवटी काय तर बर्‍यापैकी ह्यातून निसटून पण गेलो म्हणजे ठिकठाक पास झालो होतो. आता परत काय तर ह्यावेळी काही नव्हते अणि मी तिच्या उत्तराची नेहमी प्रमाणे वाट बघत होतो. दुसर्‍याच दिवशी मला उत्तर आले ना चिठ्ठी मधून 
"ये इट का जवाब पत्थर जो से जो दिया हे हमे दिल से पसंत आया हे,
कोई तो हे जिस ने हम से टकराने का दिल दिखाया हे... Impressed
आता काय तर मोका बघून मी तिला परत साफ साफ लिहले होत
I Love U...🥀 लपंडाव...

Vikas Yadav

लपंडाव.. #story

read more
मी कोणी लेखक वैगेरे नाही पण कदाचित मी पण ह्या सगळ्या टप्प्यातून निघून गेलोय हा फक्त अनुभव शेअर करतोय असे समजा. एक नवीन दिशा एका नवीन पद्धतीने विचार केला म्हणुन फक्त सांगतोय. शेवटी नात्यांमधे प्रेम किती हे महत्त्वाचे असते मग ते कोणताही असो. आपण नकळत इतके selfish झालोय त्यात मी पण आहे की आता आपण फक्त फायदा बघतो प्रत्येक relation मध्ये. ह्याच एक उत्तम उपरोधिक उदाहरण म्हणजे आजकाल बॅंका मध्ये Relation manager केलेत ग्राहकांच्या सोयीसाठी. आपण खरोखर ग्राहक झालोय का प्रत्येक relation indirectly manage करतोय आपण. खरच तुम्ही पण शोधा उत्तर ह्याच अणि वाटले तर मला तुमच मत पण शेअर करा. आता राहता राहिले तर जे खरे मित्र असतिल ना तेच तुमच्या बरोबर शेवट पर्यंत राहतील अणि त्या पण पलीकडे असतात काही नाती अशी जी सांगता येत नाहीत पण असतात बरोबर तुमच्या. पण तुमचा अनुभव नक्की सांगा.. लपंडाव..

Vikas Yadav

लपंडाव #story

read more
आता थोड दुसर्‍या भागाकडे वळूया म्हणजे ग्रुप ग्रुप थोडक्यात ही आमची पार्टी ती त्यांची पार्टी. Unusual असे असतेच प्रत्येक शाळेत वर्गात in short दोन ग्रुप असतातच. आता exactly माहीत नाही पण इथे वेगळी परिस्थिती होती. त्याचे स्तर वेगळे होते. म्हणजे एक ग्रुप असा की जो वर्ग शिक्षकांच आवडता ग्रुप म्हणजे त्यातली गँग नेहमी पुढे पुढे करणारी होती. काहीही असो त्यांनी बोलले की हे लोक होच बोलणार अणि बाकीच्यांच प्रॉब्लेम होणार एक ही गोष्ट पक्की होती. परत एक गँग म्हणजे टवाळ अणि हुशार. तसच काही एका आळीचे अणि काही दुसर्‍या आळीचे ह्यावरून पण तयार झाले होते. अजून छोट्या छोट्या अश्या गँग ग्रुप अणि थोडक्यात काय तर प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या स्ट्राँग नेटवर्क मध्ये असणार्‍या नेटवर्क बरोबर सेट होते. लपंडाव

Vikas Yadav

लपंडाव #story

read more
आपण खरच किती अनभिज्ञ असतो ना त्या काळात आपल्याला खरोखर माहीतच नसते सांगणारे खूप जण असतात. शाळेचे जे अंगण सोडून आपल्याला कॉलेज च्या आकाशात झेपवायची इतकी ओढ झालेली असते की आपण खूप गोष्ठी नकळत सोडून देतो. मला कोणीतरी बोलले होते आयुष्याचा रस्त्यावर 10 वी, 12 वी अणि लग्न ह्या तीन ठिकाणी जर गाडी नीट वळली तर पुढे कुठेही अपघात होण्याचा चान्स नसतो. ते खरोखर पटले आता. माझी शाळा ही खेड्यातली होती. ते जग इतके छोटे अणि सुंदर होत की आता वाटले उगाच पुढे आलो. सहज एकदा गेलोही होतो शाळेत तेव्हा पाहिले तर बाक बदलली आहेत जरा चांगल्या डिझाईन ची होती चेहरे पण वेगळे होते आता काळानुसार सगळे बदलतेच पण माझ्या आठवणी अजून आहेत तिथेच त्या बाकावर करकटकने ओरबडलेले नाव बघितली अणि पाणी तरळले डोळ्यात. तो माझा वर्ग मी अणि माझे मित्र तिथेच बसलो होतो तोच दंगा चालू होता अणि हो ती पण तशीच नेहमी प्रमाणे माझ्याकडे बघत होती.. लपंडाव

Vikas Yadav

लपंडाव.. #story

read more
खर तर आम्हाला एकमेकाला बघायची येवढी सवय झाली होती त्याच उदाहरण म्हणजे सकाळी प्रार्थना 5 वी ते 10 वी सगळ्यांची एकत्र असायची त्यावेळी त्या लाइन मध्ये उभे राहताना पण आम्ही असे रहायचो की एकमेकाला दिसलो पाहिजे आता तुम्ही म्हणाल काय हे पण setting असच होत. त्यानंतर एक अतिविशेष कार्यक्रम असायचा म्हणजे कोणीतरी येवून न्यूज पेपर मधील दिनविशेष वाचून दाखवायचे. आता यायचे कोणी हे volunteer होत मग मी आठवड्यातील 7 दिवस मीच का तर इकडून तिकडून बघणापेक्षा समोरूनच हल्ला केलेला बरा. माझ लक्ष्य फक्त एका विशेष कडे असायच नशीब त्यानंतर कोणी कधी विचारले नाही की काय विशेष होत नाहीतर नाव तिचेच घेतले असते. आता चाचणी परीक्षेची नोटिस पण मीच वाचून दाखवली. इकडे ही परीक्षा अणि तिकडे ती परीक्षा....पण काहीही असो मी आता तयार होतो कोणताही हल्ला झेलायला.. 😬😬 लपंडाव..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile